संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटना एकवटली
बीड: बीडच्या मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकऱणातील इतर दोन मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. आता दोन्ही आरोपींना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अन्य आरोपींच्या अटकेची शक्यता असून, एक आरोपी पकडला गेला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना अटक करण्यासाठी बीड पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले होते. या पथकाने डॉ. संभाजी वायभसे यांच्या मदतीने गोपनीय माहिती मिळवून, तांत्रिक कौशल्यांचा वापर करुन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (वय 26, रा. टाकळी, ता. केज) आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय 23, रा. टाकळी, ता. केज) यांना ताब्यात घेतले. त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाकडे पुढील तपासासाठी देण्यात येणार आहे.
भारतातील पहिली ट्रेन जी पाण्यावर धावते! प्रवाशांना मिळतात अप्रतिम सुविधा
संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून हे आरोपी पोलिसांच्या आणि सीआयडीच्या रडारवर होते. अखेर, या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती दिली जाईल.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता पर्यंत आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना सुरूवातील अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर केले. पण तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हेदेखील गेल्या 25 दिवसांपासून फरार होते. वाल्मिक कराडसह सीआयडीचे पथक या तिघांचाही शोध घेत होते. त्यातील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. पण कृष्णा आंगळे अद्यापही फरार आहे.
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायची
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका एसआयटी कमिटी स्थापन कऱण्यात आली होती. घुले आणि सांगळे यांना ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांचीही कसून चौकशी केली. यात त्याच्या डॉ.संभाजी वायबसे आणि त्याच्यावकील पत्नीसह या चौघांचीही चौकशी करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉक्टर वायबसेने आरोपी सुदर्शन घुलेला संपर्क साधल्याचा आणि पैसे पुरवल्याची माहिती तपासात समोर आली होती. या दोघांनाही नांदेडमधून ताब्यात घेण्यात आले होते.