Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकीट बुक करायची? एका क्लिकवर वाचा संपूर्ण प्रोसेस
भारतात 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु झाली असून परेड आणि बीटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमांचा सराव सुरु झाला आहे. 26 जानेवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमत्त दिल्ली आयोजित केले जाणारे कार्य़क्रम पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमांचा अनेक चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु असतो, जेणेकरून भारताच्या प्रत्येक घरातील व्यक्तिला या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा.
Elon Musk च्या Starlink ला एयर इंडियाचा झटका! Tata ची मोठी झेप, विमानांमध्ये मिळणार ही सेवा
तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम समोरासमोर पाहण्याची इच्छा असेल, तर यासाठी तुम्ही आत्ताच तुमचे तिकीट बुक करू शकता. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतींनी तुमचे तिकीट बुक करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
संरक्षण मंत्रालयाने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. परेडसाठी तिकिट बुक करण्याची किंमत 20 रुपयांपासून सुरू होते. याबाबत संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंग 2 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे. यामध्ये कोणीही स्वत:साठी तिकीट बुक करू शकतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो.
Tickets for the #RepublicDayParade (January 26) & #BeatingRetreat (Jan 28 & 29) go on sale from Jan 02, 2025. Available online via Aamantran Portal (https://t.co/IWK0rkcp4i) & app, or at designated counters across Delhi. Prices: ₹20–₹100. Bring ID for entry.
Details:… pic.twitter.com/d8jhqll51D
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) January 1, 2025
जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिकीट बुक करत असाल तर आता तुम्हाला पूर्वीसारखी काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Redmi चा लेटेस्ट स्मार्टफोन लाँच, नवीनतम MediaTek प्रोसेसरसह मिळणार हे खास फिचर्स
ज्यांना ऑफलाइन पद्धतीने तिकीट बुक करायचे आहे, त्यासाठी दिल्लीत अनेक ठिकाणी फिजिकल बूथ आणि काउंटर बनवण्यात आले आहेत. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला तुमचा ओळखपत्र सोबत ठेवावा लागेल. प्रत्यक्ष बूथ आणि काउंटरवरून पैसे देऊन तिकिटे थेट खरेदी केली जाऊ शकतात.