Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवत बनावट ई-वे बिल आणि जीएसटी बिलांच्या आधारे व्यापाऱ्याची ९.१६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांसह साखर कारखान्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 09:19 PM
साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

विटा, ( वा. ) : साखर कारखान्यांकडून साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून आणि बनावट ई-वे बिले व जीएसटी बिलांचा वापर करून व्यापाऱ्याची ९ कोटी १६ लाख २५ हजार ९९ रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे (दोघेही रा. बिरणवाडी) अक्षय अनिल पाटील (रा. वायफळे), पलूस तालुक्यातील अभिजीत हनुमंत माने (रा.धनगाव) या चौघांसह आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर (ता. माढा, सोलापूर) चे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारी असलेली ‘अन्नपूर्णा ट्रेडिंग’ नावाची कंपनी आहे, त्यांनी डिसेंबर २०२१ पासून साखर खरेदी- विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्ण रत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मड्रीम अॅग्रो सोल्युशन्स प्रा. लि. या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दीपक मोरे, राजीव मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या आमिषाला बळी पडून आशिष पाटील यांनी वेळोवेळी बँक खात्याद्वारे मोठी रक्कम या तिघांच्या खात्यावर जमा केली. मात्र साखर पुरवठा न करता कारखान्याशी संगनमत करून बनावट ई-वे बिले आणि जीएसटी बिले तयार केली. प्रत्यक्षात साखर न देता कागदोपत्री साखर पुरवल्याचे दाखवून आशिष पाटील यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. तसेच, फसवणुकीची रक्कम परत करण्याबाबत अनेकदा करार पत्रे व प्रोमिसरी नोट लिहून दिले. यानंतर या चौघांनी दिलेले त्या रकमेचे धनादेश बँकेत टाकले असता ते बाऊन्स झाले.

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

जेव्हा आशिष पाटील यांनी धनादेश बाऊन्स झाल्या बाबत त्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी आशिष पाटील यांना खोट्या अॅट्रॉसिटी आणि खंडणी च्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यावरून दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे, अक्षय अनिल पाटील, अभिजीत हनुमंत माने आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर (ता. माढा) चे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१,५०६ आणि ३४ नुसार बनावट कागदपत्रे तयार करून संगणमत करून फसवणूक करणे, विश्वासात करणे, धमकावणे इत्यादी प्रकार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या प्रकर णाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे करत आहेत.

‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Web Title: Sugar supply fraud rs 9 crore case registered vita sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Crime in Sangli
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
1

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
2

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.