काय घडलं नेमकं?
जाधववाडी येथील रहिवासी महादेव जाधव आणि त्यांच्या सख्ख्या भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून आरोपी भाऊ आणि पुतण्याने मिळून महादेव जाधव यांच्यावर हल्ला चढवला. (Solapur Crime) काही समजण्याच्या आतच दोघांनी मिळून महादेव यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी थेट महादेव यांच्या डोक्यावर वार केले. तब्बल ७ ते ८ गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यांनंतर महादेव जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. (Solapur Crime)
Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
त्यांना तातडीने करकंब येथील ‘जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Solapur Crime) या घटनेची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Solapur Crime)
प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड
सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. प्रेयसीच्या पतीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा भावजीही गंभीर जखमी झाला आहे.
Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
Ans: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाधववाडी गावात घडली.
Ans: महादेव जाधव यांच्यावर हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
Ans: जुन्या कौटुंबिक वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.






