crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यात गाड्याची तोडफोड, कोयते घेऊन दहशत माजवणे, गोळीबार करत दहशत पसरवणे अश्या अनेक गुन्हेगारी घटना समोर आले आहे. आता गाडीला कट मारून घासल्याच्या रागातून वाद झाला आणि याच वादातून एकाने देशी बनावटीचे पिस्तूल काढत हवेत थेट गोळीबार केला. खडकवासला परिसरात कोळेवाडी या ठिकाणी काल (सोमवारी, ता-4) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गाडी घासली गेली, या रागातून शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर थेट हवेत गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव अभिजित चव्हाण असे आहे.
पुढे काय घडलं?
गाडी घासल्याच्या रागातून अभिजित चव्हाण याने समोरच्या व्यक्तीला मारहाण कारण्यासाठी त्याच्या मित्रांना आणि भावाला बोलावलं. त्यांनतर त्याने थेट एका बंदुकीतून हवेत गोळीबार करून समोरच्या माणसाला धमकावण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील खडकवासला परिसरामध्ये समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अभिजित चव्हाण याला ताब्यात घेतलं. आज सकाळी इतर सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजित चव्हाणकडे ही पिस्तूल नक्की कुठून आली याचं देखील पोलीस तपास करत आहे. यासाठीही आरोपींना दुपारच्या सुमारास कोर्टात हजर केलं जाणार आहे.
सुप्रिया सुळेंची संतापजन पोस्ट
या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलातेच . त्यांनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट शेयर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हंटल आहे की खडकवासला येथील कोळेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याचा कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी इजा झाली नाही. पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? येथील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ही अतिशय संतापजनक आणि तितकीच चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्य जनता आज भीतीच्या छायेखाली जगत असून गुन्हेगारांना मात्र मोकळे रान मिळाले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे काम गृहखात्याने थांबविले आहे का असा संशय यावा इतपत ही गंभीर परिस्थिती आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी तातडीने ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”, अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.
खडकवासला येथील कोल्हेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी…
— Supriya Sule (@supriya_sule) August 5, 2025
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये तुफान राडा; 25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला