crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पिंपरी चिंचवड शहरात हुंड्याच्या छळामुळे एका २६ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव दिव्या हर्षल सूर्यवंशी असे आहे. नवरा आणि सासरच्या कुटुंबाच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. दिव्याचा नवरा आयटी अभियंता असून तो एका शिक्षकांचा मुलगा असल्याचं बोललं जात आहे. ही धक्कादायक घटना वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीतील काल संध्याकाळी घडली आहे. दिव्या सूर्यवंशी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप दिव्याच्या माहेरच्या नातेवाईकानी केला आहे.
महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
नेमकं प्रकरण काय?
दिव्या ही मूळची धुळे जिल्ह्यातली असून ती एका शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित आहे. तिचा विवाह जवळपास तीन वर्षांपूर्वी हर्षल शांताराम सूर्यवंशी या आयटी इंजिनियर तरुणाशी झाला होता. लग्न झाल्यानंतर दिव्या आपल्या पती हर्षलसोबत पुणे येथील वाकड येथे उच्चभ्रू सोसायटीत राहात होती. मात्र तोच पती हर्षल सूर्यवंशी वारंवार तिला कोणत्याही कारणाने टॉर्चर करत होता. त्याने काही दिवसांपूर्वी दिव्याच्या कुटुंबीयांकडे सोन्याच्या अंगठीची मागणी केली होती. तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप टोच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दिव्याच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप काय?
दिव्याच्या आईने सांगितले ” त्यांनीच केलं सगळं . माझी मुलगी कधीच असं टोकाचे पाऊल उचलणारी नाही .त्यांनी मारलंय माझ्या मुलीला .त्यांनीच या सर्व गोष्टी केल्यात . ती मला अनेकदा सांगायची सासरचे टोचून बोलतात .पण आपल्याकडे असं चालत नाही सहन करायचं थोडं असं मी तिला समजावत होते . आज थांबतील उद्याच थांबतील म्हणत होतो तर त्यांच्या मागण्या संपतच नव्हत्या. लग्न ठरलं त्यावेळेस 40 तोळे सोनं त्यांनी मागितलं .आम्ही ही पोरगी सुखात राहील पुण्यात चांगली राहील म्हणून लगेच साखरपुडा ठरवला .साखरपुड्याचे पाच लाख रुपये दिले . लगेच लग्न लावलं .वीस लाख रुपये खर्च केला .आम्ही शेतात कापड कष्ट करणारे लोकं आहोत . माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी दिव्याच्या आईने सरकारकडे केली आहे. दिव्याच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
असा एकही दिवस गेला नाही की तिचा छळ न झाला असेल…
हर्षल सूर्यवंशीने लग्नाच्या सहा महिन्यानंतर दिव्याला त्रास द्यायला सुरुवात केली . असा एकही दिवस गेला नाही की आज काय झालं हे सांगणारा .मी केवळ तिची वहिनी नाही लहानपणापासून आम्ही सोबत वाढलोय . मी तिची मामी बहीणही आहे . नोकरी न करण्यावरून सासरच्यांनी अनेकदा दिव्याला टोमणे मारले .नवीन घर घेतल्यानंतर या या टोमण्यांमधून मागण्यासमोर येऊ लागल्या .माहेरचांकडून फर्निचर करून घे .घरात टीव्ही -फ्रीज आणून दे असे वारंवार टोचून बोलणे सुरू झाले . दिव्याला शारीरिक मानसिक दोन्ही प्रकारचा छळ सहन करावा लागल्याचं तिच्या माहेरच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे .मृतदेहावरही अनेक मारल्याच्या खुणा दिसत असल्याचं मृत विवाहितेच्या वहिनेने सांगितलं .
आधी मारहाण केली, नंतर फाशीवर चढवलं,नातेवाईकांचा आरोप
सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या दिव्याच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत.आधी दिव्याला मारहाण करून नंतर त्यांनीच फासावर लटकवलं असल्याचं दिव्याच्या माहेरचं म्हणणं आहे. या प्रकरणात आता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिच्या सासरच्या मंडळी विरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाले आहेत. दिव्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबीयांना विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले