crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
उत्तर प्रदेश एटीएसकडून २७ ऑगस्टच्या तपासात उत्तर प्रदेशातून रक्कम ही फिलिस्तीन या देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. ३ लाख रुपये पाठवल्याचा संशय एटीएसला होता. यूपी एटीएस तपास करत आली असता भिवंडीतील तीन जणांवर पाळत ठेवली आणि संशयित दहशतवादी म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२ वर्ष ) सहारा अपार्टमेंट तहेरा मॅरेज हॉल जवळ, अबू सुफियान ताजम्मूल अन्सारी, (वय २२) जैद नेटियार अब्दुल कादिर (वय २२) रा. वेताळ पाडा भिवंडी या तीन जणांना ताब्यात घेतल आहे. महत्वाचे म्हणजे या तीन जणांवर दहशतवादी कारवाईमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
एटीएस सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार भिवंडीतून लाखो रुपयांची मदत ही उत्तर प्रदेशात पाठवली जात होती. तिथून ती पुढे फिलिस्तीन या देशात पाठवली जात असल्याची माहिती होती. त्यामुळे उत्तर प्रदेशची एक एटीएस टीम ही मुंबईत दाखल झाली आणि भिवंडीत त्यांनी तपास सुरू केला. एक दिवस या तीन जणावर पाळत ठेवली आणि एटीएस ने अखेर या तीन जणांना ताब्यात घेवून पुढील तपासासाठी लखनौला रवाना केल आहे. लखनौमध्ये आता या तीन जणांचा कसून तपास केला जाणार आहे.
गेल्याच आठवड्यात एकाला अटक
गेल्या आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरातून एकाला अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने संशयित आफताब कुरेशी याला अटक केली होती. गेल्या दोन वर्षापूर्वी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देशविघातक कृत्याच्या संशयावरून पीएफआय संघटनेच्या तीन जणांना ताब्यात घेतल होत.
भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात भीतीच वातावरण
गेल्या दोन वर्षापासून या भागात अनेक संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तवतेसह देश विघातक कारवाईच कनेक्शन आता उघड झाल आहे. ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या दृष्टीने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच घेतला फास
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्यापुजाऱ्यानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. एवढेच नाही तर तरुणीच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली तेव्हा आरोपी पुजाऱ्याने देवासमोरच दोर लावत फास घेतला आणि आत्महत्या केली. ही घटना आहे कांदिवली पश्चिम भागातील लालजीपाडा परिसरात तारकेश्वर महादेव मंदिर आहे.
Mumbai Crime: पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच घेतला फास