मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी स्वप्निल देशमुख गावातील किराणा दुकानदार अविनाश देशमुखला सातत्याने त्रास देत होता. स्वप्निलच्या त्रासाला कंटाळून अविनाशने २०२३ मध्ये गळफास घेऊन स्वत:च आयुष्य संपवलं. या प्रकरणात स्वप्निल देशमुखवर भारतीय दंड संहितेच्या 306, 504, 506, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी स्वप्निल देशमुख सतत अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखवर दबाव टाकत होता.
या संतापातूनच संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख यांनी स्वप्निल देशमुखवर जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या केली. या हल्ल्यात संतोष देशमुखचा जागीच मृत्यू झाला तर, सोनाली देशमुख गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघांच्याही पाठीवर वार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिथून हत्येसाठी वापरण्यात आलेली गुप्ती जप्त केली. विशेष म्हणजे, ज्या झाडाला अविनाश देशमुखने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली स्वप्निल देशमुखला ठार मारण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले, आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या हत्येत वापरण्यात आलेली गुप्ती घटनास्थळावरून जप्त केली आहे. स्वप्निल देशमुखची हत्या केल्यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख दोघेही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनी पोलिसांकडे स्वप्निल देशमुखविरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, ज्या झाडाला अविनाश देशमुख यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली संतोष देशमुख यांनी स्वप्निल देशमुखची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.