Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगावमधील ‘ते’ खून प्रकरण; कुटुंबीयांचे पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण, आरोपींवर ‘MCOCA’ लावण्याची मागणी

Tasgaon Crime News: तासगाव येथील वायफळे खून प्रकरणबाबत आमदार रोहित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 02, 2025 | 04:36 PM
तासगावमधील 'ते' खून प्रकरण; कुटुंबीयांचे पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण, आरोपींवर 'MCOCA' लावण्याची मागणी

तासगावमधील 'ते' खून प्रकरण; कुटुंबीयांचे पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण, आरोपींवर 'MCOCA' लावण्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली. तासगाव, तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा १२ डिसेंबर रोजी खून झाला. विशाल सज्जन फाळके याने पूर्ववैमनस्यातून पुण्यातून आपली टोळी आणून हे कृत्य केले. या प्रकरणी मुख्य संशयित विशाल फाळके याच्यासह ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अद्यापही ३ ते ४ संशयित फरार आहेत. या सर्वांना मोक्का लावा. त्यांना फाशी द्या, यासह अन्य मागण्यांसाठी मृत रोहितच्या कुटुंबीयांनी गेल्या दोन दिवसांपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण केले.

तासगाव येथील वायफळे खून प्रकरणबाबत आमदार रोहित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली. वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत. याच वादातून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. एकमेकांना गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमधील हा वाद धुमसत होता. गाव पातळीवर तो मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. याच वादातून दोन्ही कुटुंबांमधील अनेकांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

१२ डिसेंबर रोजी रोहित फाळके हा वायफळे येथील बसस्थानक चौकात आपल्या मामांच्या मुलासोबत थांबला होता. त्याचवेळी विशाल फाळके याने पुण्याहून आणलेल्या टोळीच्या मदतीने रोहित फाळके, आशिष साठे व आदित्य साठे या तिघांवर खुनी हल्ला केला. त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर शिकलगार यांनाही मारहाण केली.
या ठिकाणावरून रोहित फाळके घराकडे पळून गेला. यानंतर विशाल फाळके याच्यासह टोळीने त्याचा पाठलाग केला. त्याच्या घराजवळ धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याच ठिकाणी रोहितचे वडील संजय व आई जयश्री यांनाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान रोहित याचा मृत्यू झाला. अन्य जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.

हेही वाचा: Crime News: तरूणावर भर चौकात धारधार शस्त्राने वार; युवकाचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य

तीन ते चार संशयित अजूनही फरार
या घटनेनंतर अवघ्या २४ तासाच्या आत मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला पुणे येथून जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर लगेच अनिकेत संतोष खुळे, आकाश महिपत मळेकर, गणेश प्रकाश मळेकर व एक अल्पवयीन आरोपी अशा पाच जणांना याप्रकरणी आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर अजूनही तीन ते चार संशयित फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 विशालवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

दरम्यान, विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे विशाल फाळकेसह त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी,  खुनात सहभागी असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी, आरोपींचे कॉल डिटेल्स तपासावेत, त्यातून निष्पन्न होणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल करावा, विशाल फाळके याला न्यायालयाने वॉरंट काढले होते, मात्र तासगाव पोलिसांनी ते संबंधिताला बजावले नाही. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलिसांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशा विविध मागण्यांसाठी मृत रोहित याच्या कुटुंबीयांनी तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Tasgaon waifale case family demand to file mcoca act against accused tasgaon crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Tasgaon
  • Tasgaon Crime

संबंधित बातम्या

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
1

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
2

तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत
3

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत

Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Tasgaon Crime News: तासगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारी टोळी पकडली; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.