Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Attack Tasgaon: तासगावात पोलिसांवर दगडफेक! मंदिर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पथकावर हल्ला

Police Attack Tasgaon: जखमी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2026 | 11:15 AM
Tasgaon News, Police Attack Tasgaon, Stone Pelting Incident

Tasgaon News, Police Attack Tasgaon, Stone Pelting Incident

Follow Us
Close
Follow Us:
  • नागनाथ मंदिर चोरीप्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या तासगाव पोलिसांच्या पथकावर दगडफेक
  • तीन पोलीस जखमी झाले व वाहनाचे नुकसान झाले.
  • पोलिसांनी सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी
  • घरातून कटावणी आणि चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क जप्त करण्यात आले.
Tasgaon Mob Police Attack:  नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातील चोरीप्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या तासगाव पोलिसांच्या पथकावर मंगळवारी सकाळी तुरची फाटा परिसरातील पारधी वस्तीत दगडफेक करण्यात आली. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जयश्री शिवाजी चव्हाण, बबलू पपलू शिंदे, पूजा हिंमत शिंदे, प्रशांत हिंमत शिंदे (रा. तुरची फाटा, गायरान पारधी वस्ती), अरविंद राजू चव्हाण (रा. सांडगेवाडी) आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण (रा. बेळंकी, ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव कवठे येथील नागनाथ मंदिरातून दागिने चोरीला गेल्याप्रकरणी तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे काही संशयितांचा माग काढत पोलीस मंगळवारी सकाळी तुरची फाटा परिसरातील वस्तीत चौकशीसाठी पोहोचले होते.

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

चौकशीदरम्यान संशयितांच्या घरातून कटावणी आणि चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क पोलिसांना मिळाले. सीसीटीव्हीतील साहित्याशी त्यांचे साम्य आढळल्याने पोलिसांनी बबलू शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडे अधिक चौकशी सुरू केली. यावेळी काही महिलांनी चौकशीला विरोध करत आरडाओरडा केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने जमाव जमा झाला आणि पोलिसांशी हुज्जत घालण्यात आली.

दरम्यान, संशयितांना पोलिसांच्या वाहनात बसविण्याचा प्रयत्न होत असताना जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात पोलिसांच्या वाहनाची समोरील काच फुटली. पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या हाताला एका महिलेने चावा घेतल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. अमर सूर्यवंशी यांच्या छातीला दगड लागून दुखापत झाली, तर संतोष माळी हेही जखमी झाले.

Akola Crime: प्रेमाचे नाटक, लग्नाचे खोटे आमिष अन् 2 वर्ष अत्याचार! मोबाईलमधील फोटोंनी उघड केला प्रियकराचं गुपित

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्यातून अतिरिक्त बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयितांना ताब्यात घेतले. काही आरोपी मात्र पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जखमी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे तासगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांवर थेट हल्ला झाल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Temple theft probe turns violent in tasgaon police team faces attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • stone pelting
  • Tasgaon News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.