सावळज येथील स्मशानभूमीत लिंबू, काळे दोरे, काळे कापड, कुंकू, अंडी आणि विविध प्रकारच्या पुड्या यांसारखी जादूटोणासाठी वापरली जाणारी सामग्री आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे आक्षेप नोंदवून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे प्रकल्पाला विरोध दर्शविला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंपनीकडून जबरदस्तीने झाडे तोडली जात असल्याचा आरोप केला.
प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या दारात जाऊन संवाद साधण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शांत आणि संयमी स्वभावातून त्या प्रत्येक मतदाराची समस्या मनापासून ऐकतात आणि त्यावर वास्तववादी उपाययोजना मांडतात.
मणेराजूरी (ता. तासगाव) येथील लुगडेवाडी (भोसलेनगर) परिसराला स्वतंत्र नवे महसूली गाव म्हणून घोषित करणारी अधिसूचना ग्रामस्थांच्या माहितीत न आणता थेट राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने गावात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.
तासगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असली तरी शहरातील राजकीय वातावरण मात्र अद्याप शांत आहे. पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर उतरत आहे. “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आणि आत्मविश्वासानं लढवणार,” असा ठाम निर्धार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
तासगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार रणशिंग फुंकले आहे. लकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तासगाव शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आरोप आणि प्रत्यारोपही वाढत चालले आहेत. आता तासगावमधून रोहित पाटील यांनी थेट हल्लाबोल करत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय
ग्रामस्थांच्या मते मागील काही दशकांत झालेल्या अशा स्फोटांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही ठोस उपाययोजना होत नसल्याने लोकांचा रोष वाढला आहे. राजकीय दबावामुळे कारवाई ठप्प होत असल्याचा आरोप जनतेतून…