कल्याणमध्ये शाळेची भिंत मुलांवर कोसळली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू
बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झालं आहे तर १ व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईजवळील गढी पुलावर घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समोर आला आहे.
गाडी बाजूला करायला गेले आणि…
SUV गाडीचा डिव्हायडरवर किरकोळ अपघात झाल्यानंतर गाडीतील सर्वजण खाली उतरले होते. मात्र, या दरम्यान मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या सर्व सहा जणांना चिरडले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना इतकी वेदनादायक होती की परिसरात एकच खळबळ उडाली. मृतकांचे नाव बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे असे आहे. हे सर्वजण SUV गाडीतून प्रवास करत होते. गाडी डिव्हायडरवर आदळल्यानंतर ती बाजूला करण्यासाठी ते गाडीतून उतरले होते, आणि त्याच वेळी ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातस्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
पुण्यात जबरी चोरीच्या दोन घटना; डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले