
crime (फोटो सौजन्य: social media)
एमपी ११ / झेडडी ०९३४ क्रमांकाचा बलकर सिमेंट भरून घुग्घुसकडे येत होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने प्रथम एमएच ३४ / एए ००५१ क्रमांकाच्या कारने एवढी जोरदार धडक दिली की कारचे पूर्ण नुकसान झाले. घुग्घूस येथून कोरपना जात असलेल्या कारमध्ये कोरपना येथील राठोड कुटुंबीय, कारमध्ये पती, पत्नी आणि २० वर्षाची मुलगी प्रवास करीत होते. तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने तिघेही बचावले, मात्र सलून चालक जुनारकर (रा. घुग्घुस), यांचा अनियंत्रित वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. त्याच हॉटेलवर गाडी आदळली असता तेथे काम करणारा हॉटेल चालक गरम तेल अंगावर पडल्याने तो भाजला.
आरोपी वाहनचालक पसार
घटनेची माहिती मिळताच घुग्घूस पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमी कुटुंबाला प्रथम आरव्हीआयसीएल रुग्णवाहिकेतून चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. याच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सलून चालकाचा पंचनामा करण्यात आला. आरव्हीआयसीएलच्या क्रेनने क्षतिग्रस्त कार उचलून पोलिस ठाण्यात नेण्यात आली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. घुग्घूस पोलिसांचे एपीआय प्रफुल्ल डाहुले यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, ट्रकचालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे.
Ans: भरधाव बलकरवरील नियंत्रण सुटून आधी कारला, नंतर सलून व हॉटेलला धडक दिली.
Ans: कारमधील तिघे गंभीर जखमी झाले, हॉटेल चालक भाजला.
Ans: घुग्घूस येथील सलून चालक जुनारकर यांचा जागीच मृत्यू झाला.