Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह व विक्री प्रकरणाने खळबळ उडाली असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 04, 2025 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्ती विवाह लावणे, ५० हजार ते १.२५ लाख रुपयांत मुलींची विक्री आणि लग्नानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्याचे प्रकार समोर आले आहेत. या गंभीर घटनेत वाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

फिर्यादी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न केवळ १४ वर्षांचे असताना जीवन बाळासाहेब गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्यासोबत जबरदस्ती करण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या, तसेच ५० हजार रुपयांची रोख देवाणघेवाण करून मुलीला विकले गेले.

लग्नानंतर काही काळ संसार सामान्य चालला, मात्र २०२३ मध्ये पीडितेला जबरदस्तीने गरोदर केले गेले. पती व सासरच्या मंडळींकडून सतत शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला, मुलगी झाल्यानंतर छळाची तीव्रता वाढली. पतीने सांगितले “तुझे लग्न मी ५० हजार रुपये देऊन विकत आणले आहे.” यासोबतच गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून जन्मतारीख बदलली, मूळ जन्मतारीख १०/१०/२००८ असून पतीने ती २०/१०/२००३ दाखवली. या प्रकरणातील आरोपींमध्ये जीवन बाळासाहेब गाडे (पती), अमोल गाडे (चुलत सासरे), बाळासाहेब गाडे (सासरे), दोन चुलत सासू आणि एक नातेवाईक महिला यांचा समावेश असून यातील मध्यस्थी करणारे आरोपी रवि कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तपासात श्रमजीवी संघटनेच्या निदर्शनास असेही समोर आले की बुधावली कातकरी वाडी, तालुका वाडा येथील अजून चार मुलींची अकोले भागात १ लाख ते सव्वा लाख रुपये घेऊन लग्न लावून विक्री केली गेली आहे. या गंभीर घटनेवर श्रमजीवी संघटना महाराष्ट्र चे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चिटणीस विजय जाधव, जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड यांनी माहिती मिळताच आवाज उठवला. संघटनेचे भरत जाधव तालुका अध्यक्ष, सुरज दळवी तालुका सचिव, रेखा पऱ्हाड महिला संघटक, सुजाता पारधी ता. उपाध्यक्ष, मोतीराम वारे ता. उपाध्यक्ष यांनी हा प्रकार उजेडात आणला.

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

माहितीनुसार ही घटना दाबून ठेवण्याचा विविध स्तरावर जोमाने प्रयत्न झाले परंतु संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आदिम जमातीतली कातकरी समाजाची परिस्थिती कर्जबाजारी व दारिद्र्याने पिचलेली आहे. अशा परिस्थितीत, दलालांच्या मार्फत अल्पवयीन मुलींची विक्री वाढत चालली आहे. संघटनेने जिल्हा प्रशासनाने ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व PESA मोबिलायझर यांच्यामार्फत माहिती घेऊन संबंधित दलालांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे; अन्यथा श्रमजीवी संघटना सामाजिक प्रश्नावर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. सुरेश रेंजड यांनी दिला आहे.

या सर्वांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 394/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३७६(२)(एन), ३७०, ४६८, ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ आणि पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.उपनिरीक्षक सुमेध मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास एसडीपीओ जव्हार एस. एस. महेर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे करत आहेत.

Web Title: The case of forced marriage and sale of minor girls in wada taluka of palghar district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

गैरहजेरी लपवून हजेरीपटावर खोट्या सह्या! न्यायालयाने शिक्षकावर ठोठावला दंड
1

गैरहजेरी लपवून हजेरीपटावर खोट्या सह्या! न्यायालयाने शिक्षकावर ठोठावला दंड

मोठी बातमी! मुंबई–अहमदाबाद हायवेवर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले अन् थेट…
2

मोठी बातमी! मुंबई–अहमदाबाद हायवेवर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले अन् थेट…

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
3

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

मंजुरी असूनही रुग्णालयाचे स्वप्न धूसर! उपचारांना जवळपास अद्याप नाही इलाज, मोखाड्यात ग्रामस्थ नाराज
4

मंजुरी असूनही रुग्णालयाचे स्वप्न धूसर! उपचारांना जवळपास अद्याप नाही इलाज, मोखाड्यात ग्रामस्थ नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.