संसाराची राखरांगोळी! जास्त बोलते म्हणून नवऱ्याने थेट बायकोचा...; राज्य हादरलं
कराड : एक मोठी बातमी समोर आली आहे. विंग (ता. कराड) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळला. यामध्ये बायकोचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतले आहे. मयुरी मयूर कणसे (वय २७ रा. विंग ता. कराड) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर मयूर कणसे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशाल हा मयूरचा चुलत भाऊ आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, मयूर कणसे याच्याशी मयुरी यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या वर्षभरात त्यांचामध्ये वाद सुरु झाला. मयुरी हिचे मयूर याच्या कुटुंबातील लोकसोबत जमत नव्हते. त्यांच्याशी तिचे भांडण होत होते. त्यामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरु निघून गेली. मयूर याने मयुरीची समजूत घालत चार महिन्यापूर्वी तिला घेऊन आला. दोन्ही नवरा-बायको येथे भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु होता. बुधवारी मध्यरात्रीही त्यांच्यात वाद झाला. त्या वादात मयूर याने मयुरीला रागात मारले. त्यानंतर तिचा गळा आवळला. त्यामुळे मयुरीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मयूरने मयुरी जास्त बोलते म्हणून तिची हत्या केल्याचे विशाल कणसे यांना सांगितली. त्यानंतर विशालने पोलिसात फिर्याद दिली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चौकशी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ; चौकीत नेमकं काय घडलं?
दरम्यान, या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी संशयित पती मयूर कणसे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
पुण्यातही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.