Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आदित्य मढवी प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांचकडे वर्ग करा’ पिडीत कुटुंबियांची मागणी

पिडीत तरुणाच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या धनाढ्य स्थितीमुळे धोका असल्याचा आरोप करत, प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 07, 2025 | 08:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

एका प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला गाठून भर रस्त्यात बेदम मारहाण केली. जवळपास नऊ दिवसानंतर दहा पैकी दोन आरोपींना अटक झाली आहे. आत्ता या प्रकरणात पिडीत तरुणाच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांकडे वर्ग करा अशी मागणी केली आहे. या प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. तसेच सगळ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे.

अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

काही दिवसापूर्वी उसाटणे गावातील तरुण आदित्य मढवी याला कोळेगाव परिसरात त्याच्या कारबाहेर खेचून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मिलिंद मढवी सह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टातून निघालेला आरोपी तीन तास पोलिस ठाण्यात पोहचला नाही. या कालावधी आरोपी गेला कुठे असा प्रश्न आहे. पिडीत आरोपीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. एक तर घटनेच्या आठ दिवसानंतर काही आरोपीना अटक होते. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. आरोपी मिलिंद मढवी हा खाजगी गाडीत त्या दिवशी वापरलेले हत्यार घेऊन पोलिस ठाण्यात शरण येतो. काही क्षणात पोलिस त्याला कोर्टात घेऊन जातात.

या प्रकरणात आरोपी हे धनाढ्य असून, त्यांच्याकडून कुटुंबीयांच्या जिवीतला मोठा धोका आहे, असे पिडीत तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, पोलिसांकडून जी मदत हवी होती, ती अजिबात मिळत नाही आणि पोलिसांकडून आरोपीला ज्या प्रकारे मदत केली जात आहे, ते पाहून त्यांना न्याय मिळवण्याच्या बाबतीत शंका येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध योग्य पावले उचलली नाहीत आणि त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळवण्याची शक्यता कमी वाटते.

पुणे हादरलं! तरुणावर कोयत्याने हल्ला, हात मनगटापासून तोडला; कारण काय तर…

या सर्व परिस्थितीमुळे, पिडीत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांना विश्वास आहे की, क्राईम ब्रांच कडून तपास लवकर आणि प्रभावीपणे करण्यात येईल. पिडीत तरुणाचे भाऊ हेमंत मढवी आणि आई संगिता मढवी यांनी पोलिस आयुक्तांकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: The investigation of aditya madhavi case should be handed over to thane crime branch demand of the victims family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • Dombivli News
  • kalyan news

संबंधित बातम्या

बाहेरच्या फेरीवाल्यांमुळे कल्याणकर त्रस्त!” शिवसेना शिंदे गट आक्रमक; KDMC ला दिला आंदोलनाचा इशारा.
1

बाहेरच्या फेरीवाल्यांमुळे कल्याणकर त्रस्त!” शिवसेना शिंदे गट आक्रमक; KDMC ला दिला आंदोलनाचा इशारा.

Kalyan : डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी; शिवसेना शिंदे गट आक्रमक
2

Kalyan : डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी; शिवसेना शिंदे गट आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.