Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2024 | 02:01 PM
जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

सांगली :  कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. अफरोज पठाण यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गुलगुंजनाळ फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये तीन पत्ती जुगार चालवला जात असल्याचे उघड झाले. या छाप्यात २० लाखांची रोकड, ४२ मोबाईल फोन, तीन कार आणि दोन दुचाकींसह इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक व चालक यांच्यासह एकूण ४१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोंतेबोबलाद येथील या आंतरराष्ट्रीय जुगार अड्ड्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक जुगारी येत असत. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत फुलारी यांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधीक्षक घुगे यांना दिले. जत उपअधीक्षक सुनील साळुंखे आणि इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

२० ऑक्टोबर रोजी पोलीस पथकाने हॉटेलच्या मागील बंद खोलीत छापा टाकला. तेथे सुमारे ४१ जण तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलीसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. संतोष बजंत्री (रा. बेडगी, ता. जत) हा मुख्य आरोपी असून त्याच्यावर जुगार अड्डा चालवण्याचा आरोप आहे. याप्रकरणी ४५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात कर्नाटकातील विजयपूर येथील २१, सोलापूर जिल्ह्यातील ३, जत तालुक्यातील बेळुंडगी येथील २, उमदी येथील १, आणि कर्नाटकातील अन्य गावांतील १४ व्यक्तींचा समावेश आहे. या छाप्यामुळे सीमाभागातील अवैध व्यवसायांवर मोठा धक्का बसला आहे.

Web Title: The police has taken a major action by raiding a gambling den in jat taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 02:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sangli Crime
  • sangli news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.