
crime (फोटो सौजन्य: social media)
कल्याण: कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी आणि महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या ६ तासांच्या आत बाळाला शोधून काढून आई- वडिलांकडे सोपवले आहे. पोलिसांनी आरोपीला आत्या- भाच्याला अटक केली आहे. आरोपी तरुणाचा नाव अक्षय खरे आणि सविता खरे असे नाव आहे. चोरीच्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे
हृदयद्रावक ! दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले
काय आहे प्रकरण?
निलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम पोंगरे हे पुण्याहून मोलमजुरी करण्यासाठी आले होते. कामाच्या शोधात ते २ नोव्हेंबरला कल्याणला आले. मात्र त्यांच्या काम किंवा राहण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे ते आपल्या ३ मुलांसह कल्याण स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पादचारी पुलावर झोपले होते.
नेमकं काय घडलं
सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एक तरुण पुलावर आला. त्याने झोपलेल्या कुंचे कुटुंबाकडे पहिले आणि इकडे-तिकडे बघितले आणि संधी साधून त्याने झोपलेल्या ३ मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या ८ महिन्यांच्या बाळाला उचलले आणि तेथून पळाला. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निलेश आणि पूनम हे दोघे जागे झाले, तेव्हा त्यांच्याकडे झोपलेल्या ३ मुलांपैकी सर्वात लहान ८ महिन्यांचे बाळ त्यांना दिसले नाही. हे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना तातडीने बाळाचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र तो कुठेही सापडला नाही.
त्यांनी सकाळी ६:३०च्या सुमारास, कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण रेल्वे पोलिसांच्या सोबत महात्मा फुले पोलिसांनीही तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही फुटेज समोर
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा अक्षय खरे हा तरुण बाळाला घेऊन जातांना स्पष्टपणे दिसत होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ६ तासात आरोपीला सिंडिकेट परिसरामधून अटक केली. बाळाला पोलिसांनी त्यांच्या आई- वडिलांच्या ताब्यात दिले.
बाळाला विकण्याचा उद्देश्य
अक्षयच्या तपासात समजले की यागुन्ह्यात अक्षयची आत्या सविता खरे हीच देखील सहभाग आहे. त्यामुळे तिला देखील अटक करण्यात आली. बाळाला विकण्याच्या उद्देशानेच ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अक्षय खरे चोरी करण्यामागील नेमके कारण सांगत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.