Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यकाने (ओएसडी) पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 12:25 PM
पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

पुण्यात खळबळ! कॅबिनेट मंत्र्याच्या स्विय सहाय्यकाकडून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासारख्या शहरात एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं वाढत असतानाच राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यकाने (ओएसडी) पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याने मुलाला देखील बॅटने मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली आहे.

 

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात ४० वर्षीय स्विय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत ३० वर्षीय पत्नी आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात (३० एप्रिल) रात्री आठच्या सुमारास ही घटना क्वीन्स गार्डन येथील राहत्या घरी घडली आहे. धक्कादायक म्हणजे, पती मोबाईलवर चॅटींग करत असताना त्याबाबत विचारल्यावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

चॅटिंगवरून हटकल्याने मारहाण

संबंधित व्यक्ती राज्य सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याचा खासगी स्विय सहाय्यक आहे. घटनेच्या दिवशी तो घरी असताना मोबाइलवर चॅटींग करत होता. ते पत्नीने पाहिल्यानंतर पत्नीने त्याला याबाबत विचारले. त्याचा राग पतीला आला. यावरुन त्याने पत्नीला शिवीगाळ केली. पत्नी आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली. तसेच पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, अधिक तपास उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; महापौरांच्या फोटोमुळे सोशल मीडियावर संताप

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून

धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने मारहाण करून तिचा खून केला आणि घराला कुलूप लावून सासरा पसार झाला आहे. पोलिस पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेत असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्यावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: There has been an incident where a cabinet ministers personal assistant tried to kill his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?
2

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई
3

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना
4

Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.