Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 01:24 PM
दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

दुचाकीवरुन घरी जाताना डम्परने विद्यार्थिनीला उडवले; ग्रामस्थांनी वाहन चालकासह मुरुम माफियाला दिला चोप

Follow Us
Close
Follow Us:

पाटस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दहावीच्या विद्यार्थिनीला उडवले. मात्र या अपघातात ती विद्यार्थिनी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या एका पायाला मात्र मोठी दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी ( दि १०) सायंकाळी कुरकुंभच्या वर्दळ असलेल्या चौकात घडली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली‌ आणि संतप्त ग्रामस्थांनी वाहन चालकाला चांगलाच चोप दिला आहे. मात्र त्या ठिकाणी मळद आणि कुरकुंभ परिसरात बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या एका माफीयाने वाहन चालकाची काय चूक नाही, त्या मुलीची चूक आहे असे सांगितले. आणि मग मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाहन चालकाचा मोर्चा थेट या मुरूम माफियावरच वळवला. भर चौकात त्याची चांगलीच धुलाई केली.

दौंड तालुक्यात खडी आणि बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करीत हायवा डंपरने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. हा उच्छाद नेमका कोणाच्या आर्शिवादाने, कोणाच्या जीवावर चालला आहे? या मागे कोण आहे?, यांनी माणसं मारण्याचे लायसन्सच हे क्रेशर खडी आणि बेकायदा मुरूम उत्खनन करणाऱ्या मालक आणि चालकांना दिले काय? असा सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत.‌ अष्टविनायक महामार्गावरील देऊळगाव गाडा आहे. तेथे एका खडी वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने दुचाकीला चिरडलं, यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असताना कुरकुंभमध्ये वर्दळ असलेल्या चौकात डंपरने दुचाकीवरुन घरी जात असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनीला उडवले. मात्र या अपघातात ती थोडक्यात बचावली आहे.

डंपरवर आळा बसवण्यासाठी दौंड पोलीस अपयशी

मागील महिन्यात खडी क्रशर आणि हायवा वाहनचालक आणि मालकांची एक बैठक कुरकुंभ पोलीस मदत केंद्रात दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आला ? ही बैठक घेऊन काय साध्य झाले. कारण या बेकायदा मुरूम उत्खनन आणि नियमांचे उल्लंघन करून वाहतुकी करणाऱ्या डंपरवर आळा बसवण्यासाठी दौंड पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. ही बैठक नेमकी वाहन चालकांना कायदा आणि नियमांचे पालन करण्यासाठी होती का हप्ते वाढवण्यासाठी होती ? असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.दरम्यान, हा अपघात झाल्यानंतरही दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.

Web Title: There has been an incident where a girl was hit by a dumper while going home on a bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident News
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी
1

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना
2

माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना

Mira Bhayander : RMC प्लांट बंद करा; डंपरमुळे झालेल्या अपघाताने नागरिकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
3

Mira Bhayander : RMC प्लांट बंद करा; डंपरमुळे झालेल्या अपघाताने नागरिकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

MiraBhayander : रेडीमिक्स डंपरच्या अपघाताने 11 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत ; वाहतूक विभागाचा निष्काळजीपणावर मनसेचा रस्ता रोको
4

MiraBhayander : रेडीमिक्स डंपरच्या अपघाताने 11 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत ; वाहतूक विभागाचा निष्काळजीपणावर मनसेचा रस्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.