Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरला

हडपसर भागात चोरट्यांनी पुन्हा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ४ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर हडपसर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 29, 2025 | 04:41 PM
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरला

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; फ्लॅटचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरला

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हडपसर भागात चोरट्यांनी पुन्हा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ४ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर हडपसर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३९ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर भागातील साडेसतरा नळी परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहतात. दरम्यान, त्या शुक्रवारी दुपारनंतर काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाट उचकटून ४ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

दुसरी घटना एनडीए परिसरातील खडकवाडी गावात घडली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन हजार रुपये लांबविले आहेत. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार एनडीए-खडकवासला रस्त्यावरील खडकवाडी गावात राहायला आहेत. गुरुवारी (२७ जून) तरुण, त्याचे आई-वडील घरात झोपले होते. चोरट्याने खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. कपाटातील दोन हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार शेलार तपास करत आहेत.

Web Title: Thieves break the lock of a flat in pune and steal gold ornaments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • crime news
  • House Theft
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
2

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
3

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
4

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.