500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्...; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
मुंबई : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. फसवणुकीच्या घटनाना बळी न पडण्याचे आवाहनही पोलीस वेळोवेळी करत आहेत मात्र तरीही घटना कमी होताना दिसत नाही. अशातच आता मुंबईतून एक मोठी घटना समोर आली आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात एका तरुणाची फसवणुक झाली आहे आहे. शारीरिक संबंधाच्या आमिषाला बळी पडून अनोळखी महिलेवर विश्वास ठेवताना त्याला तब्बल ३५ हजारांचा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सीएसएमटी स्थानकात असताना, एका अनोळखी महिलेने त्याच्याशी संपर्क साधून ५०० रुपयांत शरीरसंबंधाची डील ठरवली. त्यानंतर तिने तक्रारदाराला टॅक्सीने पठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलजवळील इमारतीत नेले. पहिल्या मजल्यावरील खोलीत गेल्यानंतर तिच्यासोबत आणखी तीन महिला खोलीत आल्या. चौघींनी मिळून तक्रारदाराला धमकावत बदनामीची भीती दाखवली. त्याच्या मोबाईलवरून २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले तसेच १३ हजार रुपये रोख रक्कमही हिसकावली. घटनेनंतर पीडित तरूणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, तीन आरोपी महिलांना ताब्यात घेतलं आहे तसेच एकीचा शोध सुरू आहे.
घटनेनंतर पीडित तरुणाने तात्काळ व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आणि फसवणुकीत सामील असलेल्या तीन महिलांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे माजिदा नूर सरदार गाझी, रुपा विश्वनाथ दास आणि नसिम्मा जमान शेख अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळेल असे एका व्यक्तीला आमिष दाखवून तब्बल ६३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधून समोर आली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यावरून एक कोटी १५ लाख रुपयांचा व्यवहार उघडकीस आला आहे. विविध राज्यांतून १० तक्रारीही दाखल झाल्या आहेत. प्रथमेश शिवाजी भुसे (वय २३, रा. लोहगाव, पुणे; मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिन राधाकिसन मोरे (वय ३४, रा. दिघी), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.