Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: विद्येच्या माहेरघरात गुन्ह्यांचे सत्र सुरूच! ‘या’ भागात चोरट्यांनी साफ केला हात

कर्वे रस्त्यावरून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडील १ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2025 | 07:14 PM
Pune Crime: विद्येच्या माहेरघरात गुन्ह्यांचे सत्र सुरूच! 'या' भागात चोरट्यांनी साफ केला हात

Pune Crime: विद्येच्या माहेरघरात गुन्ह्यांचे सत्र सुरूच! 'या' भागात चोरट्यांनी साफ केला हात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरात बंद फ्लॅट फोडणारे आणि बसप्रवासात महिलांकडील किंमती ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, खराडीत बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, कर्वेनगर आणि शनिपार चौकातून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यां महिलांकडील सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार या खराडीतील लेन नंबर ८ मध्ये राहण्यास आहेत. दरम्यान, त्या दोन दिवसांपुर्वी (दि. १७ मार्च) सकाळी साडे दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून गेल्या होत्या. परत रात्री आठच्या सुमारास आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी त्यांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, लोखंडी कपाटातील रोकड व दागिने असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहेत.

कर्वे रस्त्यावर बसमध्ये चोरी

कर्वे रस्त्यावरून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडील १ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली असून, याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात ६८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. त्यासोबतच बालाजीनगर येथून शनिपार चौकात येण्यासाठी पीएमपीने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने व रोकड असा १ लाख १ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

वडगावात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, महिलांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांकडून तक्रार दाखल

वडगावात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये धूमस्टाईल दुचाकीवरून भरधाव जात रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. शहरात सलग दोन दिवस सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडल्याने पायी फिरणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वडगाव शहरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही अज्ञात चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा या घटना एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा या घडल्या आहेत. तसेच चोरटे चपळाईने पळ काढत आहेत. वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानेही चोरटे खुलेआम दागिने हिसकवण्याचे प्रयत्न करत आहे.

Web Title: Thieves stolen at kharadi cloes flat shanipar chowk karve road area and pmp bus pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत
1

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
2

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड
3

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Sangli Crime: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला, भांडण थांबवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू; गाव बंदची हाक
4

Sangli Crime: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला, भांडण थांबवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू; गाव बंदची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.