Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्ते बंद असणार असून, वाहतुकीसाठी वर्तुळाकार पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 12:18 PM
पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; 'हे' महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्ते बंद असणार असून, वाहतुकीसाठी वर्तुळाकार पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यवर्ती येणाऱ्या प्रमुख प्रवेशमार्गावरील दहा ठिकाणी मिरवणुकीच्या स्थितीनुसार वाहतूक वळविली आहे. दांडेकर पूल, नळ स्टॉप, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर, जुना बाजार, पुणे स्टेशन, टिंबर मार्केट, डायस प्लॉट, मार्केट यार्डमार्गे दांडेकर पूल असा हा वर्तुळाकार मार्ग असणार आहे.

पुणे शहरात आज गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्व प्रमुख रस्ते मिरवणुकांमुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र, अशावेळी शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात वाहन घेऊन जाताना नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाची आखणी केली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील अपोलो टॉकीज-दारुवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील ढोले चौक (सेव्हन लव्हज), सातारा रस्त्यावरील वीर बाजी पासलकर चौक (व्होल्गा चौक), बाजीराव रस्त्यावरील सावरकर पुतळा चौक, लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन कॉलेज रस्ता) गोखले चौक या ठिकाणी शहरात येणारी वाहतूक अडविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

असा असणाार वर्तुळाकार मार्ग 

कर्वे रस्ता जंक्शन, नळ स्टॉप, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, भाऊसाहेब खुडे चौक (सिमला ऑफिस), संचेती हॉस्पिटल, सीओईपी, शाहिर अमर शेख चौक, मालधक्का, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर पोलिस चौकी, ढोले चौक, वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी, मार्केट यार्ड जंक्शन, सातारा रस्ता, व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, सावरकर चौक, लालबहादूर शास्त्री रस्ता आणि सेनादत्त पोलिस चौकीमार्गे म्हात्रे पूल ते नळ स्टॉप असा हा पर्यायी वर्तुळाकार मार्ग असेल. या मार्गावर २५ सप्टेंबरपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Major changes have been made to the traffic arrangements in pune city for the ganesh visarjan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
1

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
2

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
3

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
4

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.