Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्लासचालक होते आणि त्यांना फसवून नेण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 09:20 PM
Rohit Pawar on mpsc paper leak

Rohit Pawar on mpsc paper leak

Follow Us
Follow Us:
  • २७ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता गरवारे रोडवर ठिय्या आंदोलन
  • पुणे पोलिसांनी अद्याप आंदोलनाला दिली नाही परवानगी
  • सरकारने विद्यार्थ्यांच्या १५ सदस्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची मागणी 

पुणे/Rohit Pawar:
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी २७ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता गरवारे रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, त्यापूर्वी सरकारने (MPSC) विद्यार्थ्यांच्या १५ सदस्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आंदोलनासाठी पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी आंदोलन होणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विद्यार्थ्यांनी २६ सप्टेंबरला आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे २७ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलन किती दिवस चालेल, हे निश्चित नसून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. काही विद्यार्थी उपोषणाच्या तयारीत असल्याचेही पवार यांनी सांगितले.

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा, तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे आणि ७० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करणे यासह विद्यार्थ्यांच्या पाच मागण्या असल्याचे पवार यांनी सांगितले. आयोगाच्या अध्यक्षांविरोधातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मागण्या मान्य झाल्यास सरकारचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्लासचालक होते आणि त्यांना फसवून नेण्यात आले, असा आरोप पवार यांनी केला. आंदोलनाशी संबंधित सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना पोलिसांच्या नोटिसा देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी बुधवारी दिल्लीला जाणार असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे. राहुल गांधी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. पेपरफुटीच्या आधीच राधा समिती स्थापन करण्यात आली होती. समितीकडून टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत भूमिका मांडली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे पवार म्हणाले.

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

मराठवाड्यातील अतिवृष्टीवरूनही सरकारला सवाल

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पीक नुकसानीवरूनही पवार यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यात सुमारे ३५ हजार कोटी, तर राज्यात ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. एकरी साडेआठ हजार रुपये मदत दिली तर उर्वरित नुकसानभरपाईचे काय, असा सवाल त्यांनी केला. पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करून शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना त्यात सहभागी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी मागणीही पवार यांनी केली. अलनिनोचे संकट मार्च २०२७ पर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच सांगितले होते, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Mla rohit pawar statement about pune police dont given permission to mpsc students protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • MPSC Paper Leak
  • Pune Police
  • rohit pawar

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
1

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल
2

Rohit Pawar : ‘निर्णय घेता येत नसेल तर बांधावर फिरता कशाला? आता मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा!’ रोहित पवारांचा सरकारला सवाल

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
3

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी
4

MPSC Paper Leak : रोहित पवार पुन्हा आक्रमक; 26 सप्टेंबरला पुण्यात आंदोलन, भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.