Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shirdi Saibaba Temple Threat: धक्कादायक! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ही धमकी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आल्याने, याला विशेष गांभीर्याने घेतले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 03, 2025 | 04:18 PM
Shirdi Saibaba Temple Threat: धक्कादायक! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी (प्रतिनिधी) – जगप्रसिद्ध शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ही धमकी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आल्याने, याला विशेष गांभीर्याने घेतले जात आहे. यापूर्वीही साईबाबा संस्थानला वेगवेगळ्या स्वरूपातील धमकीचे मेल्स आणि पत्रे मिळाली होती, मात्र यावेळी देशातील सुरक्षेचा विषय अधिक तीव्र झाल्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता कडेकोट उपाययोजना केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शिर्डी देवस्थानच्या प्रशासनाला या धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये आणखी काय आहे, याबाबत अजून काही खुलासा झालेला नाही.सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीदेखील या मेलविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. साई संस्थानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील धमकीचे मेल आले आहेत. पण तपासाअंती हे मेल बनावट असल्याचे आढळून आले होते. पण जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (Terrorist) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात आधीच संतापाची लाट असताना,शिर्डीतील साईसंस्थान मंदिरालाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीच्या मेलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, हा मेल खरचं धमकीचा आहे की, कोणी खोडसाळपणा केला, याचा तपास पोलिस घेत आहे.

Chagan Bhujbal: मुख्यमंत्रीपदावरून भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या आयुष्यात दोन ते…”

दरम्यान, कालच (३ मे) केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनीही साईसमाधीचं दर्शन घेऊन ते . त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं काय प्रत्युत्तर असेल, यावर ‘आता फक्त ॲक्शन पाहा…ॲक्शन!’, असे सूचक विधान केले होते. पण मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राहाता इथल्या गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी सत्कार देखील नाकारला. जोपर्यंत पहलगाम घटनेचा बदला घेतला जाणार नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याचा संकल्प असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) इथं सहा मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तिथं गुंतली आहे. यातच शिर्डी साईसंस्थानला मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास

 

Web Title: Threat to blow up shirdis sai samadhi temple with pipe bomb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Bomb Blast Case

संबंधित बातम्या

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले
1

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात मोठा बॉम्बस्फोट; क्वेटा येथे जाणाऱ्या रेल्वेला केलं लक्ष्य, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
2

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात मोठा बॉम्बस्फोट; क्वेटा येथे जाणाऱ्या रेल्वेला केलं लक्ष्य, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Shirdi : मंत्रीपदानंतर भुजबळ पहिल्यांदाच साईंच्या दरबारी !
3

Shirdi : मंत्रीपदानंतर भुजबळ पहिल्यांदाच साईंच्या दरबारी !

Shirdi Saibaba Mandir : साईबाबा मंदिरात आता तिरुपतीच्या धर्तीवर नवी ‘डोनेशन पॉलिसी’; सामान्य भाविकांना मिळणार या सुविधा
4

Shirdi Saibaba Mandir : साईबाबा मंदिरात आता तिरुपतीच्या धर्तीवर नवी ‘डोनेशन पॉलिसी’; सामान्य भाविकांना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.