फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
विराट कोहली विक्रम : सध्या क्रिकेट चाहत्यांचे इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधून भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या इंडियन प्रीमियर लीग जोरात सुरू आहे. आज म्हणजेच ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक शानदार सामना रंगणार आहे. या सामन्यांमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली हे दोघे या सीझनमध्ये शेवटचे एकत्र पाहायला मिळणार आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत, जो या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जेव्हा विराट चेन्नईविरुद्ध धमाकेदार खेळ करण्यासाठी चेपॉकला येईल तेव्हा त्याच्या नजरेत एक मोठा विक्रम असणार आहे. आज ५१ धावा करून डेव्हिड वॉर्नरचा महान विक्रम मोडण्याच्या इराद्यात असेल.
आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली डेव्हिड वॉर्नरला मागे टाकू शकतो. सध्या सर्वाधिक धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे, त्याने पंजाब किंग्जविरुद्ध २६ सामन्यात ११३४ धावा केल्या आहेत, तर विराटने चेन्नईविरुद्ध ३४ सामन्यात ३७.३७ च्या सरासरीने आणि १२५.४६ च्या स्ट्राईक रेटने १०८४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद ९० धावा आहे. आता जर कोहलीने आज ५१ धावा केल्या तर वॉर्नरचा विक्रम मोडला जाईल.
STAR SPORTS POSTER FOR VIRAT KOHLI & MS DHONI ❤️ pic.twitter.com/6cXyRQ148X
— Johns. (@CricCrazyJohns) May 3, 2025
विराट ११०० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. आयपीएलमध्ये भरपूर धावा करणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत एका संघाविरुद्ध दोनदा ११००+ धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्ध ही कामगिरी केली. आता तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही ११०० धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्यांना फक्त १६ धावांची आवश्यकता आहे.
आयपीएल २०२५ मधील विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने या सीझनमधील आतापर्यत १० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १० सामन्यात ४४३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ६ अर्धशतकाचा समावेश आहे.