बिश्नोई गँगची पुन्हा धमकी; आता फॅशन डिझायनरला आला फोन, मागितली 55 लाखांची खंडणी
पाटणा: ‘ इंडिया आघाडीचे पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेश रंजन यादव (पप्पू यादव) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. पप्पू यादवकडे सध्या Y श्रेणीची सुरक्षा असून आता त्यांनी Z+ सुरक्षेची मागणी केली आहे. पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. ज्याचे कॉल रेकॉर्डिंग पप्पू यादव यांनी जारी केले आहे.
पप्पू यादव यांना फोन करणाऱ्याने धमकी देत सलमान खानसंदर्भात सुरू असलेल्या प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.इतकेच नव्हे तर लॉरेन्स बिश्नोई हा पप्पू यादवचा चाहता आहे, पण पप्पू यादवने लॉरेन्सचा विश्वासघात केला. धमकीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पप्पू यादव संसदेत म्हणाले की, मला शिकवू नका, मी 6 वेळा खासदार आहे, मी स्वबळावर जिंकलो आहे आणि कोणाच्याही आधाराने आलो नाही,असे म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा: Sharad Pawar group 4th List: शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर; काटोलचा उमेदवार बदलला
पप्पू यादव म्हणाले की, लॉरेन्स भाईने लाखो रुपये देऊन जेल जॅमरला फोन केला होता, पण पप्पू यादव फोन उचलत नाही. यासोबतच आम्हाला राजकारण करायचे नाही, असे फोन करणाऱ्याने सांगितले. आमचा थेट फंडा आहे जो आमच्या मार्गात जे काही येईल तो बाजूला केली जाईल. जे होईल ते होतच राहील, असे ते म्हणाले. तो पुन्हा फोन करणार नाही, असे स्पष्ट केले. कॉल करणाऱ्याच्या डीपीवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो होता.
हे संपूर्ण प्रकरण बाबा सिद्दीकी हत्येशी संबंधित आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराच्या हत्येनंतर पप्पू यादवने सोशल मीडियावर लिहून लॉरेन्स बिश्नोईला नालायक गुंड संबोधले आणि प्रशासनाने शिथिलता दिल्यास 24 तासांत संपूर्ण टोळीचा खात्मा करू, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर खासदार पप्पू यादव नुकतेच मुंबईला गेले होते. तेथे त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यात आपण सलमान खानला भेटू शकलो नाही. पण मी त्याच्याशी फोनवर बोललो आहे. मी सलमान खानसोबत आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
मात्र, पप्पू यादवच्या धमकीच्या तक्रारीनंतर एसपी कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, पप्पू यादव यांना धमकीची मिळाली आहे. त्यांना Y श्रेणीतील सुरक्षा आधीपासूनच आहे. पण आत त्यांच्या सभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा: गावे शहरांवर पडतायेत भारी… ग्रामीण भागातील मागणीत मोठी वाढ,