
Message of bomb planted in Mahanagari Express
Train Bomb Threat News: राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या भीषण घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर देशातील विविध राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेनंतर तपास यंत्रणांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. स्फोटामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत राष्ट्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाली आहे.
दरम्यान, दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रालाही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली असून रेल्वे स्थानकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी चौकशी वाढविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ट्रेन थांबवून तपास केला; मात्र सुदैवाने तो मेसेज अफवा असल्याचे निष्पन्न झाले. तरीही सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा संशयास्पद संदेश आढळल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एक्सप्रेसच्या एका कोचच्या शौचालयात हा संदेश लिहिलेला आढळला असून, त्यामध्ये “पाकिस्तान जिंदाबाद”, “आयएसआय” यांसारखे शब्द आणि गाडीत बॉम्ब असल्याचा उल्लेख असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सूत्रांनी दिली आहे.
या संदेशाची माहिती समजताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ रेल्वे प्रशासन, RPF आणि स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. महानगरी एक्सप्रेसची जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर तपासणी करण्यात आली. स्फोटक सामग्रीसारखे काहीही सापडले नसले तरी खबरदारी म्हणून संपूर्ण ट्रेन आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून, प्रवाशांच्या हालचालींवरही काटेकोर नजर ठेवली जात आहे. तपास यंत्रणांकडून संदेश कोणाकडून आणि कोणत्या हेतूने लिहिला गेला, याचा शोध घेतला जात आहे.
मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती एका प्रवाशाने दिल्यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. तत्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क करत गाडी भुसावळ रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली.
रेल्वे सुरक्षा बल (RPF), लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तत्काळ गाडीची कसून तपासणी केली. श्वानपथकाच्या मदतीने प्रत्येक कोच आणि शौचालयाची तपासणी करण्यात आली. मात्र, गाडीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळून आलेली नाही, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर महानगरी एक्सप्रेसला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सर्व स्थानकांवर सतर्कता वाढवण्याचे आदेश दिले असून प्रवाशांना संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरी एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये अज्ञात व्यक्तीने “पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद… ट्रेनमध्ये बॉम्ब आहे” असा संदेश लिहिल्याचे आढळून आले. हा संदेश लक्षात आल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका प्रवाशाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर गाडीची कसून तपासणी केली. श्वानपथकाच्या मदतीने प्रत्येक कोच, शौचालय आणि सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन करत, “अफवांवर विश्वास ठेवू नका,” असा संदेश दिला आहे. घटनेचा पुढील तपास रेल्वे सुरक्षा बलाकडून सुरू आहे.