मनोज जरांगे हत्येच्या कटप्रकरणात धनंजय मुंडेच्या समर्थकाला अटक
Manoj Jarange Murder Conspiracy : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्य हत्येचा कट रचण्यात आल्याची बातमी समोर आली होती. खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच याचा खुलासा केला होता. आता या जरांगे पाटील यांच्या हत्येचा कटातील संशयित आरोपी कांचन साळवी याला बीडमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापूर्वी तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन साळवी हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक असून बीड शहरातील काही कामे पाहायचा. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खुसाला केला, त्यावेळी त्यांनी कांचन साळवे याचे नाव घेतले होते. त्यानंतर काल पोलिसांनी बीड शहरातून जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान जरांगेपाटील यांच्या घातपाताचा कट रचल्याप्रकणी पोलिसांनी आणखी एकाला बेड्या ठोकल्या. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दादा गरुड, अमोल खुणे यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात दादा गरूड आणि अमोल खुणे या दोघांचाही सहभाग होता. या दोघांचा कांचन साळवी याच्याशी संबध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनीकेली होता. या प्रकरणी पोलिसांनी कांचन साळवेला ताब्यात घेतलं. आज त्याला जालना येथील अंबड सत्र न्यायालयात हजर केले जाईल.
साळवीकडून पोलिसांना कोणते खुलासे मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी जालना पोलिसांकडे दाखल केली होती.
जरांगे यांनी या कटामागे थेट आमदार धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. “माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत,” असे जरांगे यांनी सांगितले होते. या आरोपानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडेंनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आता या प्रकरणात मुंडे समर्थक साळवीला अटक झाल्याने, तो पोलिसांसमोर काय उघड करतो, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.






