सहारनपूरच्या सहकारी व्यापारी कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पसार, सौरभच्या आत्महत्यानंतर प्रकरणाला येणार नवं वळण? (फोटो सौजन्य-ट्विटर)
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये राहणाऱ्या सराफ व्यापारात गुंतवणूनक करणाऱ्या सौरभ बब्बर आणि त्याची पत्नी मोना बब्बक या दोघांनी हरिद्वारच्या गंगेत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलं. रात्री उशिरापर्यंत पत्नीचा मृतदेह सापडला नव्हता. दरम्यान, पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मृत्यूपूर्वी या जोडप्याने एक सुसाईड नोट सोडली होती, ज्यामध्ये त्यांनी कर्जाच्या त्रासामुळे जीवन संपवल्याचे लिहिले होते. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या दाम्पत्याला दोन निरागस मुले आहेत. याचदरम्यान आता या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहे.
सहारनपूर सराफा व्यावसायिक सौरभ आणि त्यांची पत्नी मोना यांच्या मृत्यूने लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ कर्जाच्या दबावाखाली या जोडप्याने आपले जीवन संपवले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर सौरभ-मोनाने व्यवसायासाठी 10-15 कोटींचे कर्ज कसे घेतले?
सौरभ आणि मोना या दोघांनी सराफा (ज्वेलरी) व्यवसायात पैसे गुंतले होते. याशिवाय सौरभ सुवर्ण समितीही चालवत होता. या गोल्ट कमिटीमध्ये सुमारे 1 हजार लोकांनी पैसे जमा केले जात होते. या योजनेत सहभागी असलेल्या अनेकांचे पैसेही त्यांनी परत केले होते.
हे सुद्धा वाचा: आत्महत्येपूर्वी सेल्फी, व्हॉट्सॲपवर मित्राला पाठवली चिठ्ठी; त्यानंतर पती-पत्नीने गंगेत घेतली उडी
सौरभ आणि मोना मिळून हा व्यवसाय करत होते. या कामात सहारनपूरचा एक मोठा व्यापारी त्यांना मदत करत होता. मात्र या व्यावसायिकाच्या मुलाने सौरभचा विश्वासघात केल्याचे धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे या वेळीही सौरभने लोकांना सोने देण्यासाठी पैसे जमा करायला लावले. ही रक्कम सुमारे 6 ते 7 कोटी इतकी होती. सौरभने हे सर्व पैसे त्याच मोठ्या व्यावसायिकाकडे जमा केले होते. मात्र सुमारे 20 दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा मुलगा हे सर्व पैसे घेऊन दुबईला गेला.
त्यावर सौरभने व्यावसायिकाकडे जमा केलेले पैसे मागितले. मात्र व्यावसायिकाने रक्कम परत करण्यास नकार दिला. याचा सौरभला धक्काच बसला. ज्या लोकांकडून त्याने पैसे घेतले होते ते पैसे परत करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होते. लोक त्याच्याकडे पैसे आणि सोने मागत होते. पण सौरभ काहीच परत करण्याच्या मनस्थितीत नव्हता. हा दबाव त्याला सहन न झाल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केली.
“सौरभ सोन्याची समिती चालवायचा. आम्ही सोने दिले होते, ज्याची किंमत सुमारे 70 हजार रुपये होती. सौरभने आम्हाला काही पैसे दिले होते आणि काही दिवसांनी सोने घेऊन जाण्यास सांगितले होते. आता फोन आला की त्याच्याकडे आहे. हरिद्वारमध्ये आत्महत्या केली.
सौरभची अशी बिकट अवस्था पाहून त्याच्या दुकानात काम करणाऱ्या गोलूने पगारही मागितला नाही. पण सौरभ त्याला पगार द्यायचा. गोलूला कल्पना आली की भाऊ आणि वहिनी नाराज आहेत. त्याच्यावर खूप कर्ज आहे. पण सौरभ आणि मोना असं पाऊल उचलतील याची कोणालाच कल्पना नव्हती.