याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर प्रस्ताव कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशिलदार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत तयार करून हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी पोलीस उप अधीक्षक राजश्री पाटील यांनी केली.
सुनावणीनंतर आशिष उर्फ बाळू अरुण कुर्ले व श्रीधर उर्फ भैया काशीनाथ थोरवडे या दोघांना दोन वर्षांसाठी सातारा व सांगली जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले. या टोळीवर पूर्वी अनेकवेळा अटक आणि प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा), तसेच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ आनंदा जाधव व मपोको सोनाली मोहिते यांनी महत्वाची भूमिका बजावली.
Crime News: कोल्हापूरसह कोकणात धुमाकूळ घालणारा चोरटा जेरबंद; 15 मोटरसायकल अन् 10 लाख…
सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध भविष्यातही हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कडक कारवाया सुरू राहतील, अशी माहिती पोलीस
कोल्हापूरसह कोकणात धुमाकूळ घालणारा चोरटा जेरबंद
कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण आणि कर्नाटकात धुमाकूळ घालणार्या अक्षय राजू शेलार (वय २५, मूळ रा. भगतसिंग चौक, जवाहरनगर, सध्या रा. राशीन, ता. कर्जत) या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या १० लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तब्बल १५ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे.