
धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत...
मुंबई : डेटिंग अॅपच्या माध्यमातून युवतींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.
सांताक्रूझ येथील दोन सख्ख्या बहिणींशी टिंडर अॅपवरून दोन तरुणांची ओळख झाली. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर आरोपींनी दोघींना नवी मुंबईतील सीवूड् येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यांच्यासाठी ऑनलाईन टॅक्सीही बुक केली. सीवूड् येथे पोहोचल्यानंतर आरोपी दोन्ही बहिणींना मॉलसह विविध ठिकाणी फिरायला घेऊन गेले. यादरम्यान एका ठिकाणी नेऊन त्यांना जबरदस्तीने बिअर पाजल्याचा आरोप आहे.
दोघी नशेत असल्याचा फायदा घेत आरोपींनी ‘आराम करण्यासाठी’ हॉटेलमध्ये जाण्याचे सांगितले. त्यानंतर सीवूड्मधील एका हॉटेलमध्ये नेऊन दोन्ही बहिणींवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. पीडितांपैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे.
मॉल व हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले
घटनेनंतर दोन्ही बहिणी घरी पोहोचल्या आणि त्यांनी पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपासासाठी हे प्रकरण नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.
दोघींची वैद्यकीय तपासणी
पोलिसांनी दोघींची वैद्यकीय तपासणी केली असून, मॉल व हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. ऑनलाईन टॅक्सीच्या बुकिंगची माहितीही तपासली जात आहे. अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश कसा मिळाला, याबाबत हॉटेल व्यवस्थापनाची भूमिकाही तपासली जात आहे.
5 वर्षीय मुलींवर बसमध्ये अत्याचार
कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. स्कूल बसमधील क्लीनरने पाच वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यात शाळेच्या बसमधील क्लिनरने पाच वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर कथित लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी करण दीपक पाटील (वय २४) याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून शाळा व वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.