Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

सोलापुरामधील माळशिरस-पिलीव मार्गावरील ब्रिजखाली गर्भलिंग निदानाच्या प्रकरणात २५ लाख रुपयांची तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. प्रकरणातील आरोपी डॉक्टरसोबत तडजोडीच्या नावाखाली ५.५ लाख रुपये स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 30, 2026 | 11:22 AM
गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

Follow Us
Follow Us:
  • सोलापुरमध्ये गर्भलिंगनिदान चाचणीचं मोठं रॅकेट उघड
  • डीवायएसपी अडकला संशयाच्या भोवऱ्यात
  • 5.5 लाख स्विकारताना दोन एजेंटला केली अटक
Solapur Crime News: अकलूजमध्ये गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी पोलिसांच्या नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात ५.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अकलूजचे पोलीस उपअधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुक्रवारी दुपारी एसीबीचा सापळा

माळशिरस-पिलीव मार्गावरील ब्रिजखाली शुक्रवारी दुपारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस शिपायाच्या नावाने साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोन दलालांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अकलूज पोलिस दलात खळबळ उडाली आहे.                                                                                                मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या नावाने पाच लाख रुपये, तर पोलिस शिपाई राहुल वाघ यांच्या नावाने ५० हजार रुपयांची मागणी झाल्याचा आरोप आहे. दलालांना अटक केल्यानंतर संबंधित पोलिस शिपाई आणि PSIविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. उपअधीक्षक वाळके यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Thane Crme: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

डमी रुग्णाच्या माध्यमातून रॅकेटचा पर्दाफाश

दरम्यान, अकलूज पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी डमी रुग्ण पाठवून गर्भलिंगनिदान चाचणीच्या कथित रॅकेटचा पर्दाफाश केला होता.  या कारवाईनंतर संबंधित डॉक्टर दांपत्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना अटक न करण्यासाठी २५ लाख रुपयांची तडजोड मागितल्याचा आरोप करण्यात आला. या कथित व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. यापूर्वी या प्रकरणात १० लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी ५.५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारण्याच्या वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत दोन्ही दलालांना ताब्यात घेतले.                                                                                                                                                                 या कारवाईनंतर गर्भलिंगनिदान रॅकेटसोबतच पोलिसांकडून कथित लाचखोरीचा प्रकारही चर्चेत आला आहे. संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका होती, लाचेची मागणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे.

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

Web Title: Two middlemen caught in acb trap while accepting 55 lakh as part of a 25 lakh deal for illegal prenatal sex determination doctor outsmarted the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 11:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.