Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे आज, मंगळवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी हॉटेल अभिजितच्या जवळ पिकअप आणि दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2025 | 02:25 PM
पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक, 2 महिलांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Follow Us
Follow Us:
  • पिकअप- दूध टँकरची जोरदार धडक
  • 2 महिलांचा मृत्यू
  • जखमींचाही आकडा समोर
ओतूर/ मनोहर हिंगणे : नगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूरजवळील डुंबरवाडी येथे आज, मंगळवार (३० डिसेंबर) रोजी सकाळी हॉटेल अभिजितच्या जवळ पिकअप आणि दूध टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात पिकअपमधील दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य अंदाजे ३५ ते ३८ जण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातून शेतमजुरांना घेऊन एक पिकअप गाडी (क्रमांक एम एच १६सी. डी ८१५५) ही आळेफाटाच्या दिशेने जात होती. दरम्यान, समोरून (कल्याणच्या दिशेने) येणाऱ्या कात्रज दूध संघाचा गाडी क्रमांक (एम एच १२ एक्स एम ६१२१) आणि पिकअपची डुंबरवाडी येथील अभिजीत हॉटेलजवळ समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, पिकअपमधील मजूर रस्त्यावर फेकले गेले आणि गाड्यांचा चक्काचूर झाला. दरम्यान ​या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही महिला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील रहिवासी आहेत.

वंदना गणेश हिल्लम (वय २०, रा. खुट्टल, ता. मुरबाड), २) मंदा शिवराम हिल्लम (वय ३५, रा. तळेगाव, ता. मुरबाड) अशी या अपघातात मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. ​अपघात होताच डुंबरवाडीतील स्थानिक नागरिक आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

दरम्यान या अपघातातील पिकअप चालक, दूध टँकरचालक आणि काही गंभीर जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात व मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ​तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ओतूर, बगाडवाडी, अकोले, पाचघर, निमगिरी, लहाळी, टोकवडा, फोफसंडी, मांडवे आणि बल्लाळवाडी येथील सुमारे २६ महिला व पुरुष मजुरांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती डॉ. श्रीहरी सारोकते व प्रशांत गोरे यांनी दिली. ​अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two people have died in a serious accident on the nagar kalyan national highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.