Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा-मुंढरी एसटी बसमधून 2 विद्यार्थिनींना रात्री अंधारात रोहा येथे उतरविल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्य प्रवासी नसल्याचे कारण देण्यात आले. या घटनेमुळे Bhandara News मध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 16, 2026 | 07:14 PM
Two Students Left Stranded At Night By ST Bus (फोटो सौजन्य-AI एआय)

Two Students Left Stranded At Night By ST Bus (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • भंडारा-मुंढरी बसमधील चालक आणि वाहकाने 2 विद्यार्थिनींना रात्री रोहा येथे उतरविल्याचा आरोप आहे.
  • अन्य प्रवासी नसल्याचे कारण देत विद्यार्थिनींना नियोजित गावापूर्वीच बसमधून उतरविण्यात आले.
  • नरेश ईश्वरकर यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारून कारवाईची मागणी केली.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद मिरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना भंडारा-मुंढरी मार्गावर घडली. बसमध्ये अन्य प्रवासी नसल्याचे कारण पुढे करीत चालक आणि वाहकाने दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात नियोजित गावापूर्वीच रोहा येथे उतरवून दिले. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शेतात धान कापणी करताना वाघाचा अचानक हल्ला; तरुणाचा उपचारासाठी नेताना मृत्यू

भंडारा येथून मुंढरीकडे जाणारी एमएच-४०/वाय-५००८ क्रमांकाची एसटी बस रात्री रोहा येथे पोहोचली. रोहा येथून पुढे मुंढरीपर्यंत जाण्यासाठी बसमध्ये या दोन विद्यार्थिनींशिवाय अन्य प्रवासी नव्हते. त्यामुळे चालक आणि वाहकाने विद्यार्थिनींना पुढे नेण्याऐवजी रोहा येथेच उतरविले. रात्रीच्या अंधारात दोन मुलींना वाटेतच सोडून देण्याच्या या प्रकाराची माहिती जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांना मिळाली. त्यांनी नियोजित दौरा रद्द करून तातडीने रोहा गाठले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर ईश्वरकर यांनी चालक आणि वाहकाला जाब विचारला. तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाची तक्रार केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. ईश्वरकर आणि पालक वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने मार्गी लागला.

Bhandara News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू! परसवाडा नाल्याजवळील घटना; अल्पवयीन मुलगा गंभीर

मात्र, रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींना त्यांच्या नियोजित गावापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना, केवळ अन्य प्रवासी नसल्याचे कारण देऊन त्यांना अर्ध्या रस्त्यात उतरविणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यार्थिनींच्या बाबतीत काही अनुचित घडले असते, तर त्याची जबाबदारी कुणी स्वीकारली असती? असा संतप्त प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भंडारा-मुंढरी एसटी बसमध्ये नेमकी काय घटना घडली?

    Ans: भंडारा-मुंढरी मार्गावरील एसटी बसच्या चालक आणि वाहकाने अन्य प्रवासी नसल्याचे कारण देत 2 विद्यार्थिनींना रात्री रोहा येथे उतरविल्याचा आरोप आहे.

  • Que: विद्यार्थिनींना बसमधून कुठे उतरविण्यात आले?

    Ans: भंडारा येथून मुंढरीकडे जाणाऱ्या एमएच-40/वाय-5008 क्रमांकाच्या बसमधून विद्यार्थिनींना रोहा येथे उतरविण्यात आले. त्यांना मुंढरीपर्यंत जायचे होते.

  • Que: या घटनेनंतर नरेश ईश्वरकर यांनी काय केले?

    Ans: घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी आपला दौरा रद्द करून रोहा येथे धाव घेतली. त्यांनी चालक आणि वाहकाला जाब विचारला तसेच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.

Web Title: Bhandara mundhari st bus student safety incident ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत
1

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! फोर्स वन कमांडोंचे प्रशासकीय नियंत्रण आता ATSकडे, दहशतवादविरोधी यंत्रणेत महत्त्वाचा बदल
2

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! फोर्स वन कमांडोंचे प्रशासकीय नियंत्रण आता ATSकडे, दहशतवादविरोधी यंत्रणेत महत्त्वाचा बदल

Adani Tarali Project: अदाणींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका; काम तातडीने बंद करण्याचे आदेश, तीन दिवसांत खुलासा मागितला
3

Adani Tarali Project: अदाणींच्या तारळी प्रकल्पाला वनविभागाचा दणका; काम तातडीने बंद करण्याचे आदेश, तीन दिवसांत खुलासा मागितला

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
4

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.