
अडीच हजारांची लाच घेणं भोवलं; आरटीओ अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले
पथकाने ट्रेलरमध्ये बसून चालकाचे सहकारी असल्याचे भासवून कारवाई केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी (जि. सोलापूर) येथील आरटीओ चेकपोस्टवर नियमितपणे वाहनचालकांकडून लाच घेतली जात असल्याची तक्रार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ट्रेलरच्या चालकाने केली होती. यामुळे पथकाने पंच व तक्रारदारासह गुरुवारी दुपारी चेकपोस्टवर जाऊन पडताळणी केली. तेव्हा आरोपी तानाजी धुमाळ यांच्या कक्षातील खासगी व्यक्ती अमोल पाटील याने तक्रारदाराकडून गाडी पास करण्यासाठी तीन हजार रुपये मागितले. नंतर तडजोडीअंती अडीच हजार रुपये लाच स्वीकारली.
पैसे घेतले, ड्रॉव्हरमध्ये ठेवले
पडताळणीदरम्यान आरोपी मोटारवाहन निरीक्षक तानाजी धुमाळ याने चेकपोस्टच्या त्यांच्या कक्षात त्याच्या शेजारी बसलेला आरोपी खाजगी व्यक्ती अमोल पाटील याने तक्रारदार यांच्याकडून २५०० लाच स्वीकारून ते पैसे तानाजी थुमाळ मोटार वाहन निरीक्षक यांच्यासमोरील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवल्यानंतर दोन्ही आरोपींना सापळा रचून पथकाने लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.