नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकची दोन बसेसना जोरदार धडक, 5 प्रवासी जखमी
वडगाव मावळ : खंडाळा घाटात एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी (१२ जुलै) संध्याकाळी खोपोलीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून वाहतूक केलेले लोखंडी पाइप अचानक घसरले . यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी व कारवर ट्रकमधील लोखंडी सळी कोसळली. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे, पोलिस हवालदार अमोल धायगुडे, तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ मदतकार्य हाती घेतले. पाइपखाली अडकेलेल्या महिलांना बाहेर काढण्यात आले, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
हे देखील वाचा – धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले; बुधवार पेठेत नेले अन्…
या अपघातात दुचाकीवरील वाजेत राहणाऱ्या २६ वर्षाच्या ऋतुजा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत बसलेले २९ वर्षाचे वैभव गलांडे गंभीर जखमी झाले आहे. याशिवाय ट्रकमागून येणाऱ्या कारवर देखील लोखंड सळी कोसळल्या. यामध्ये कारमध्ये बसलेल्या मुळशीच्या अंकिता शिंदे (वय २८) यांचा देखील जागीच मृत्यू झाला. तर कारमधील वारजेचे प्रवासी सोनाली खडेत्रे (वय ३३), शिवराज खेडेत्रे) (वय ६) लता शिंदे (वय ५०) व नेरेचे ललित शिंदे (वय ३०) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. खोपोलीहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने खंडात घाट चढताना अचान ब्रेक मारला. यामुळे ट्रकमधील लोखंडी पाईप घसरले. हे पाईप थेट ट्रकच्या मागे येणार्या दुचाकी आणि चारचाकीवर कोसळले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहूतक व्यवस्था पुन्हा सुरळित करण्यात आली. या प्रकरणाचा तपास खोपोली पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल धायगुडे करत आहे.
हे देखील वाचा – पुण्यात हॉटेलमधील सुरक्षारक्षकावर हल्ला; धारधार हत्याराने वार केले अन्…