Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका; मावळातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अजित पवारांचा कानमंत्र

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 04, 2026 | 01:24 PM
DCM Ajit Pawar met newly elected corporators and mayor of Maval congratulated political news

DCM Ajit Pawar met newly elected corporators and mayor of Maval congratulated political news

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Politics : वडगाव मावळ : लोकांनी आपल्याला सेवेसाठी निवडून दिले आहे, हे सदैव लक्षात ठेवून काम करावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना दिली.
मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव मावळ नगरपंचायत येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

शिवराज पॅलेसमध्ये सन्मान व पक्षप्रवेश कार्यक्रम

जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश आप्पा ढोरे, शंकरराव शेळके, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, अशोक भेगडे, विलासराव काळोखे, सुरेश धोत्रे, भरत येवले, दीपक हुलावळे, अतुल वायकर आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

मूलभूत सुविधांवर लक्ष द्या

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष द्यावे. मावळ तालुक्यात औद्योगिक, पर्यटन आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना समन्वयाने वाव मिळाला पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करा.आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून माझी अनेक वर्षांची खंत भरून निघाली. शब्द दिल्याप्रमाणे विकासनिधी कमी पडू दिला नाही. तालुक्यातील प्रकल्पांमुळे पर्यटन व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिसिंग लिंक, ग्लास स्काय वॉक, भंडारा डोंगराच्या पायथ्याशी संतभूमी कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांमुळे मावळचे वैभव वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

या वेळी लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष व नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजी राक्षे, उत्तम सातकर, संतोष शिंदे, रोहित लांघे, भारत चिकणे, गणेश आहेर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवक्ते राज खांडभोर यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव शिंदे यांनी मानले.

हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

जेवढा निधी दिला, तेवढे मताधिक्य जनतेने दिले : आमदार शेळके

आमदार सुनील शेळके म्हणाले, “मावळच्या जनतेने राष्ट्रवादीचा आमदार देऊन दादांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनीही भरघोस निधी देऊन शब्द पूर्ण केला. या निधीतून झालेल्या विकासकामांची जाण ठेवून जनतेने निवडणुकीत मोठे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून जनतेचा विश्वास सर्वांनी सार्थ ठरवावा.” अजित पवार म्हणाले की, “जागतिक सायकल स्पर्धेमुळे मावळ जगाच्या नकाशावर पुणे जिल्ह्यात होणारी जागतिक सायकल स्पर्धा मावळ तालुक्यातील काही भागातून जाणार आहे. त्या अनुषंगाने रस्ते विकास करण्यात आला आहे. जगभरातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असून, यामुळे मावळचे निसर्गसौंदर्य आणि पर्यटन जगभर पोहोचेल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: Dcm ajit pawar met newly elected corporators and mayor of maval congratulated political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maval news
  • Maval Politics

संबंधित बातम्या

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले
1

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल
2

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक
3

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

Maharashtra Budget 2026 : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
4

Maharashtra Budget 2026 : ही दोस्ती तुटायची नाही..! दिवंगत नेते अजित पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.