
भावाच्या खुनानंतर गुन्हेगारीत प्रवेश, पुण्याच्या मध्यभागात दहशत; वाचा उमेश चव्हाण टोळीचा संपूर्ण इतिहास
उमेश सिताराम चव्हाण पुण्याच्या गुन्हेगारीत काही काळ नावजलेल नाव. उमेश हा रविवार पेठेत राहण्यास आहे. त्याला पाच भाऊ. चव्हाण वाडा म्हणून स्वतंत्र वाडात रविवार पेठेत चव्हाणांचा. पिडीजात व्यावसाय यांच मुक्य काम. उमेशचे शिक्षणही दहावीपर्यंत झालेले. पण, यांच्यात एक भाऊ आडदांड शरिरयष्टीचा. दिसण्यातच त्याच्या भयावहता होती. तो नागरिकांना पैसे मागून त्रास देत होता.
…अन् गुन्हेगारीत प्रवेश
आंदेकर व माळवदकर टोळीच्या छायेत चव्हाण कुटूंब होते. पण, गुन्हेगारीशी त्यांचा संबंध नव्हता. पण, आडदांड शरिरयष्टी असलेला उमेशचा भाऊ मुकेश याचा २००४ मध्ये प्रमोद माळवदकर व त्यांच्या टोळीतील मुलांनी मंगळवार पेठेतील पारगे चौक येथे खून केला. या खूनानंतर चव्हाण गुन्हेगारीत आला.
काही महिन्यातच खूनाचा बदला
मुकेश चव्हाण यांच्या खूनानंतर काही महिन्यातच चुलत भाऊ राकेश प्रताप चव्हाण आणि त्याच्या मित्रांनी थेट प्रमोद माळवदकर याचा चुलते मामा माळवदकर यांचा सोमवार पेठेतील जगन्नाथ हॉटेलसमोर खून केला. या खूनाचा बदला म्हणून हा खून झाला होता. पण, प्रत्यक्षात या खूनाने आंदेकर, माळवदकरनंतर तिसरी टोळी म्हणून पुण्याच्या मध्यभागात चव्हाण टोळी निर्माण झाली होती.
निलेश व गणेश यांच्या खूनाचा प्रयत्न
प्रमोद माळवदकरचा चुलता मामा माळवदकर यांच्या खूनानंतर माळवदकर टोळीत प्रचंड राग निर्माण झाला होता. या खूनाचा बदला घेण्यासाठी त्यांनीही कट रचला. चव्हाण कुटूंबातील उमेश चव्हाण व त्याच्या भावांचा खून करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. पण, तो फसला. ते दोनही वेळा वाचले. नंतर त्यांनी निलेश चव्हाण व गणेश चव्हाण यांच्यावर हल्ला करून खूनाचा प्रयत्न केला होता.
पुन्हा एक खून अन् टोळीची दहशत
चव्हाण टोळीतील दोघा भावांच्या खूनाचा प्रयत्न झाल्यानंतर चव्हाण टोळीने पुन्हा प्रमोद माळवदकर टोळीतील समीर वायकर याचा वाकडेवाडी परिसरात खून केला आणि खऱ्या अर्थाने चव्हाण टोळीची दहशत गुन्हेगारी क्षेत्रात वाढली. उमेश चव्हाण या टोळीला घिसाडी टोळी म्हणून पोलिस आणि गुन्हेगारी क्षेत्रात ओळखले जात होते.
माळवदकरनंतर आंदेकर टोळीशी वाद अन् खून
उमेश चव्हाण टोळीचा माळवदकर टोळीशी पहिल्यापासून वाद राहिला आणि रक्तरंजित खेळ देखील त्यांच्यात होत राहिला. पण, काही काळानंतर चव्हाण टोळीचा आंदेकर गँगशी देखील वादविवाद सुरू झाला. त्यातूनच समीर वायकर याच्या खूनात उमेश चव्हाण याच्यासह विजय निंबाळकर व इतर कारागृहात होते. त्यातून विजय कारागृहातून जामीनावर बाहेर आला होता. या वादातून विजय याचा बंडू आंदेकर, सोमनाथ गायकवाड व इतरांनी नाना पेठेत खून केला. तेव्हापासून चव्हाण व आंदेकर टोळीशी दुश्मनी सुरू झाली. पण, नंतर या टोळीत युद्ध भडकले नाही. पण, गेल्या काही वर्षांपुर्वी एकाचा किरकोळ वादातून फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत चव्हाण टोळीने खून केला होता.
मध्यभागात टोळीची दहशत
चव्हाण टोळी स्वतंत्र झाल्यानंतर अनेक गुन्हे दाखल झाले. उमेश चव्हाण टोळीप्रमुख वागू लागला तर त्याचा एक भाऊ या टोळीचा खरा मास्टर माईंड असल्याचे पोलिस सांगतात. गुरूवार पेठ, रवीवार पेठ, कसबा पेठ, या भागात टोळीची दहशत होती. मोठी आर्थिक माया देखील जमवली. उमेश चव्हाण याने नंतर राजकारणात देखील प्रवेश केला आणि अलिकडेच झालेल्या निवडणूकीत निवडणूक देखील लढवली होती.
गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब
चव्हाण टोळीत सध्याच्या रेकॉर्डनुसार आकरा सदस्य आहेत. त्यातील १ जण जेलमध्ये आहे. आणि इतर बाहेर आहेत. टोळीचे वलय मध्यभागात होते. पण, गेल्या काही वर्षांपासून ही टोळी देखील बाबा बोडके टोळीनुसार गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब आहे, असे पोलिसांच्या तपासात आहे. गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब होत समाजकार्यात जास्त सक्रिय असल्याचे सांगितले जाते.