Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकाल तख्तच्या इशाऱ्याचा परिणाम? पंजाब पोलिसांनी अमृतपाल प्रकरणात अटक केलेल्या तब्बल ‘एवढ्या’ आरोपींची केली सुटका

पंजाबमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या अकाल तख्तच्या बैठकीत अमृतपाल प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणांची २४ तासांच्या आत सुटका करावी, असा इशारा सरकारला दिला होता. या इशाऱ्यानंतर तीन दिवसांनी ३० मार्च रोजी पकडलेल्या ३६० तरुणांपैकी ३४८ तरुणांची सुटका करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 30, 2023 | 09:11 PM
अकाल तख्तच्या इशाऱ्याचा परिणाम? पंजाब पोलिसांनी अमृतपाल प्रकरणात अटक केलेल्या तब्बल ‘एवढ्या’ आरोपींची केली सुटका
Follow Us
Close
Follow Us:

अमृतपाल प्रकरणादरम्यान (Amritpal Singh Case Update) ताब्यात घेण्यात आलेल्या ३६० आरोपींपैकी ३४८ आरोपींना पंजाब पोलिसांनी सोडले आहे (Punjab Police Freed). तीन दिवसांपूर्वी अकाल तख्तने सरकारला २४ तासांत ‘निर्दोष’ तरुणांची सुटका करण्याचा इशारा दिला होता (Akal Takht had warned the government to release the ‘innocent’ youth within 24 hours).

पंजाब पोलिसांची ही कारवाई अकाल तख्त गाठण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या ३६० आरोपींपैकी बहुतेकांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले. २७ मार्च रोजी अकाल तख्तने पंजाब सरकारला अटकेत असलेल्या ‘निर्दोष’ तरुणांची सुटका करण्याचा अल्टिमेटम दिला होता.

१८ मार्चपासून कारवाई झाली सुरू

अमृतपाल सिंग यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अकाल तख्तने १८ मार्च रोजी अमृतसरमध्ये बैठक बोलावली होती. पंजाबमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी या बैठकीत विचारवंत, शीख वकील, पत्रकार, धार्मिक आणि सामाजिक नेत्यांसह शीख संघटनांना बोलावण्यात आले होते.

[read_also content=”रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार, हावड्यात अनेक वाहनांची जाळपोळ, वडोदऱ्यात दोनदा दगडफेक; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/stone-pelting-in-vadodara-on-ramnavami-shobha-yatra-again-in-fathehpura-read-the-full-story-nrvb-379805.html”]

NSA लादण्यास विरोध केला

बैठकीत अकाल तख्तचे जथेदार हरप्रीत सिंग यांनी पोलिस कारवाईदरम्यान काही लोकांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध केला. ग्यानी हरप्रीत सिंह म्हणाले होते की, या देशात लाखो लोक हिंदु राष्ट्राची चर्चा करतात. जे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावरही NSA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास त्याचे परिणाम भोगायलाही आम्ही तयार आहोत.

तरुणांना न सोडण्यावर केलं होतं भाष्य

हरप्रीत सिंग यांनी पंजाबमधील ज्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी केली होती. पोलिसांनी पंजाबच्या तरुणांना सोडले नाही तर हिंसक आंदोलन केले जाणार नाही, पण मुत्सद्दी पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सांगण्यात आले.

[read_also content=”स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ https://www.navarashtra.com/web-stories/smriti-irani-has-not-eaten-her-favorite-black-dal-for-40-years/”]

अमृतपालने अनेकवेळा बदलला आपला ठावठिकाणा

१८ मार्च रोजी पोलिसांनी अमृतपालवर कारवाई सुरू केली. त्यानंतर बारा दिवस उलटून गेले तरी फरारी अमृतपालला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, त्याने अनेकदा आपला ठावठिकाणा बदलला आहे. पंजाब पोलिसांशिवाय दिल्ली आणि हरियाणाचे पोलिसही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

पाठलाग करून कार सोडून फरार

दोन दिवसांपूर्वी २८ मार्चच्या रात्री उशिरा तो पंजाबमधील फगवाडा येथे असल्याची माहिती मिळाली होती. वास्तविक, पोलीस अज्ञात वाहनाचा पाठलाग करत होते. यामध्ये अमृतपालचा सहभाग असण्याची शक्यता होती. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर हे वाहन होशियारपूरमधील मार्नियान येथील गुरुद्वाराजवळ पोहोचले आणि त्यात बसलेले लोक वाहन सोडून पळून गेले. त्या गाडीत अमृतपाल आणि त्याचा साथीदार पप्पलप्रीत प्रवास करत असल्याचा पोलिसांना संशय होता.

Web Title: Update akal takht warning punjab police freed 348 arrests people related with amritpal singh case nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2023 | 09:11 PM

Topics:  

  • Punjab Police

संबंधित बातम्या

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक
1

MLA Raman Arora : पंजाबमध्ये आप अडचणीत, आमदार रमन अरोरा यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.