Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: ‘तू दुसऱ्याशी का बोलतेस?’… संशयातून 17 वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या; प्रियकर अटकेत

लखनऊमध्ये 17 वर्षीय BCA विद्यार्थिनीची तिच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. नातेवाइकांनी हत्येपूर्वी बलात्काराचा आरोप केल्यानंतर प्रकरणात POCSOसह अन्य गंभीर कलमे वाढवण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लखनऊमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीची घरात गळा चिरून हत्या; प्रियकर अटकेत.
  • दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयातून हत्या केल्याची आरोपीची कबुली.
  • नातेवाइकांच्या आरोपानंतर प्रकरणात POCSOसह गंभीर कलमे वाढवून तपास सुरू.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय विद्यार्थिनींची तिच्याच घरात गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या वेळी ही विद्यार्थिनी घरात एकटीच होती. तिची हत्या तिच्या प्रियकराने संशयातून केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येपूर्वी तिचा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील आहे.

‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…

नेमकं काय घडलं?

आरोपीचं नाव देवांश पाठक असे आहे. मृतक अल्पवयीन ही बीसीए (BCA) प्रथम वर्षात शिकत होती. घटनेच्या दिवशी तिचे आई-वडील हे मूळ गावी गेले होते. तर तिची मोठी बहीण कॉलेजमध्ये होती. मोठी बहीण घरी परतल्यावर ती पहिल्या मजल्यावर गेली असता तिला बहिणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हे दृश्य बघून ती खूप घाबरली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासासाठी आवश्यक ते पुरावे गोळा केले. पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला अटक केली आहे.

हत्यामागचे कारण काय?

पोलिसांनी आरोपी देवांश पाठक याची चौकशी केली असता त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि मृत मुलगी गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी एकत्र शिक्षणही घेतले होते. मृत विद्यार्थिनी दुसऱ्या एका तरुणाशी बोलत असल्याचा संशय देवांशला आला होता. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता आणि एकमेकांशी बोलणेही बंद झाले होते. बुधवारी (5 जुलै) दुपारी देवांश संभाषणाच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला. तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात देवांशने चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली.

हत्येपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप

मृत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कुटुंबाचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणात बीएनएसचे कलम 66 आणि पोक्सो (POCSO) कायद्याची कलमे वाढवली आहेत. पोलिसांनी आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहे.

पुण्यातील बाणेरमध्ये एकाचा खून, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; कारण…

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थिनीची हत्या कुठे झाली?

    Ans: लखनऊतील तिच्याच घरात.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी प्रियकराला अटक करून POCSOसह गंभीर कलमे लावली.

Web Title: Uttar pradesh crime why do you talk to others 17 year old female students throat slit over suspicion boyfriend arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.