Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand News: 12 वीची टॉपर, पण नैराश्याशी हरली; सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा’

डेहराडूनमध्ये 12 वीमध्ये 97 टक्के गुण मिळवून अव्वल ठरलेल्या 23 वर्षीय रिया थापा हिने नीट परीक्षेच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा, यात कोणाचीही चूक नाही’ अशी चिठ्ठी सापडली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 08:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 97% गुण मिळवलेल्या रिया थापा नीट परीक्षेची तयारी करत होती.
  • आत्महत्येपूर्वी तिने आई-वडिलांसाठी भावनिक चिठ्ठी लिहिली.
  • प्राथमिक तपासात परीक्षेचा ताण आणि नैराश्याचा कोन समोर आला आहे.
डेहराडून : उत्तराखंडमधील डेहराडून येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 12 वीच्या परीक्षेत तब्बल 97 टक्के गुण मिळवून शाळेत अव्वल ठरलेल्या 23 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून नीट (NEET) परीक्षेची तयारी करणारी ही तरुणी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी तिने आई-वडिलांसाठी लिहिलेली भावनिक चिठ्ठी सापडली असून, त्यात तिने “आय लव्ह यू मम्मी-पप्पा, यात कोणाचीही चूक नाही,” असे लिहिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव रिया कुमारी थापा (२३ वर्ष) असे आहे. ती 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील एका माजी सैनिकाची मुलगी होती. नेहमी प्रमाणे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून रिया झोपलेली मात्र मंगळवारी दुपारपर्यंत खोली बाहेर आलीच नाही. त्यामुळे रियाची आई तिला जेवणासाठी बोलवायला गेली तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. रियाच्या आईला संशय आला, त्यांनी तातडीने रियाच्या वडिलांना बोलावले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

आय लव्ह यू मम्मी, पप्पा…

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रियाचा मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना सुसाईड नोट सापडला. तिने हिंदीमध्ये लिहिलेल्या या चिठ्ठीत म्हटले आहे की, आय लव्ह यू मम्मी, पप्पा. या सर्व गोष्टींमध्ये कोणाचीही चूक नाही. रियाने आपल्या पालकांबद्दल प्रेम व्यक्त केले असून आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नाही, या भावनेतून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. अभ्यासात यश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

12 वी मध्ये 97 टक्के

रिया ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने 12 वीच्या परीक्षेत तब्बल 97 टक्के मार्क्स मिळवून शाळेत अव्वल येण्याचा बहुमान मिळवला होता. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने नीट-युजी ची तयारी करत होती. पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नव्हते, त्यामुळे ती येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्रिक्षेची जोरदार तयारी करत होती. ती दररोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि सकाळी उशिरा उठायची, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील वाढते नैराश्य, शैक्षणिक ताण आणि स्पर्धेच्या दबावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थिनीचे नाव काय होते?

    Ans: रिया कुमारी थापा असे तिचे नाव होते.

  • Que: रिया कोणत्या परीक्षेची तयारी करत होती?

    Ans: ती वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET-UG) ची तयारी करत होती.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय सापडले?

    Ans: ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा, यात कोणाचीही चूक नाही’ अशी चिठ्ठी पोलिसांना सापडली.

Web Title: Uttarakhand news class 12 topper loses battle against depression suicide note reads i love you mummy papa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • crime
  • Uttarakhand
  • Uttarakhand News

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.