Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल; महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाकडे

महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा 20 वर्षांनंतर निकाल लागणार आहे. 2006 मध्ये कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात 9 आरोपींवर खटला सुरू असून आजच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती.
  • राजकीय वैरातून हत्या झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
  • 20 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयात निकाल जाहीर होणार आहे.
Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागणार आहे. 2006 मध्ये झालेल्या या हत्याकांडानंतर सुरू झालेला न्यायालयीन प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल १६ जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर हा निकाल आज लागणार आहे.

Pune News: जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी, पण लोहगडावर काळाचा घाला; 26 वर्षीय तरुण उद्योजकाचा 350 फूट दरीत पडून मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. गोळीबार दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत केला होता. ही हत्या राजकीय वादातून करण्यात आल्याचे समोर आले होते. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. याप्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन खटला अंतिम टप्प्यात असून 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती. मात्र, आणखी काही कमतरता दूर करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख देण्यात आली. आज निकालाची तारीख असल्याने दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar)हेही आज न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

25 लाखांची सुपारी देऊन हत्या

माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती. मात्र 20 जून ही नवी तारीख देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर आज निकाल लागणार आहे. 2006 मध्ये झालेल्या या हत्येप्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे वडील पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar)  हे आधी ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, त्यांनी बंडखोरी केली असून, आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते ठाकरेंच्या मेळाव्यालाही अनुपस्थित होते. त्यामुळे या चर्चांना जोर आला आहे. पुढील धोका लक्षात घेता या बंडखोर खासदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे घराबाहेर चोख सुरक्षाही तैनात आहे.

निकालानंतर भूमिका करणार स्पष्ट?

ओमराजे निंबाळकर यांचं संपूर्ण कुटुंब निकालासाठी पुण्याला असून, घरी कोणीही नाही. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता आज येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

Pune Crime: पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: पवनराजे निंबाळकर हत्याकांड कधी घडलं?

    Ans: 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती.

  • Que: या प्रकरणात किती आरोपी आहेत?

    Ans: या प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपी आहेत.

  • Que: हत्येमागे काय कारण असल्याचा आरोप आहे?

    Ans: राजकीय वैरातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

Web Title: Verdict in the pawanraje nimbalkar double murder case today after a 20 year wait maharashtras eyes are on the court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • crime
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.