Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा; दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान

दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2025 | 10:58 AM
जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा; दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान

जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा; दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान

Follow Us
Follow Us:

जालना : जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले.

पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून, गांधीनगर परिसरामध्ये सध्या शांतता आहे. या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले. सध्या मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना चालू असून, सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेस गालबोट लागू नये, शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप भारती, कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलिसी निरीक्षक सिध्दार्थ माने, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश ऊनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच जो कुणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सदरील प्रकरण हे हिंदू-मुस्लिम नसून शेजारी राहणाऱ्या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून, शहरांमध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले. सध्या गांधीनगर भागात पोलीसांचा फौजफाटा तैनात असून, परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास पोलीसांना यश आलेलं आहे.

Web Title: Violent clash broke out between two groups in gandhinagar area of jalna nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • Communal Violence
  • Crime in Jalna
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.