
वाळूजमध्ये नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवणारे जेरबंद! खवड्या डोंगरावरून पोलिसांनी 'अशा' आवळल्या मुसक्या (Photo Credit- X)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांच्या जुन्या वादातून मधुकर रामा भालेराव याला धडा शिकवण्याच्या उद्देशाने आरोपींनी कट रचला होता. गुरुवारी दुपारी हे तिन्ही आरोपी हातात तलवारी आणि लाकडी दांडे घेऊन दुचाकीवर (ट्रिपल सीट) बजाजनगर परिसरात फिरत होते. गर्दीच्या ठिकाणी त्यांनी मधुकर भालेराव याला गाठले आणि ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर तलवारीने गंभीर वार केले. या कृत्यानंतर परिसरात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले होते.
गुन्हा केल्यानंतर आरोपींनी गुरुवारी रात्रभर खवड्या डोंगरावर मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी त्यांनी पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर जाऊन त्यांना धमकावले आणि त्यानंतर आपले मोबाईल फोन स्विच ऑफ करून ते मनमाडच्या दिशेने पळून गेले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी हे आरोपी पुन्हा खवड्या डोंगर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली.
Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंगर परिसरात सापळा रचला. रात्री आठच्या सुमारास तिघे जण पायी डोंगराकडे येताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली असता, आरोपींनी वेगवेगळ्या दिशेला पळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अंधारातच सुमारे दीड किलोमीटर त्यांचा पाठलाग केला आणि तिघांनाही पकडले. कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
१. ऋषीकेश उर्फ मारी शालीक सोनवणे २. प्रकाश रमेश गायकवाड ३. अभीजीत किशोर फाटे
पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपआयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, प्रविण पाथरकर, अरुण उगले, अविनाश ढगे, राजाराम वाघ, सुरेश भिसे, नितीन ईनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, संदीप तागड, रोहीत चिचाले आणि शिवनारायण नागरे यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.