प्राप्त माहितीनुसार, मंगेशच्या घराजवळच रमेश गेडाम यांचे घर होते. या घरावरून रमेशचा त्यांच्याच भावाशी वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गोलूने घरासाठी ग्राहक आणला होता. रमेशच्या भावाने गोलूसोबत मिळून ते घर विकले. रमेश यांनी बनावट कागदपत्रांद्वारे घर विकल्यामुळे न्यायालयात खटला दाखल केला. मंगेश या कामात रमेश यांना मदत करीत होते. यामुळे गोलू आणि मंगेश यांच्यात वैर निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता अक्षित घराच्या छतावर फिरत होता. दरम्यान, वडील मंगेश काम आटोपून घरी येताना दिसले. घराजवळच गोलूने त्यांचा रस्ता अडवला. कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आरडा-ओरड झाल्याने मंगेशचे वडील भीमराव आणि पत्नी अमृता मदतीसाठी धावले. अमृताने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता गोलूने त्यांच्या गळ्याला कोयता लावला. वडील भीमराव यांनी काठी मारून सुनेला वाचवले. या दरम्यान गोलूने भीमराव यांच्या हातावर वार करून जखमी केले.
धमकावून झाला पसार
परिसरातील नागरिक गोळा झाले. गोलूने त्यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी मंगेश यांना उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भीमराव यांना उपचारानंतर सुटी दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून गोलूचा शोध सुरू केला आहे. गोलूविरुद्ध घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. घराच्या वादातून त्याने अनेकदा मंगेश यांना मारण्याची धमकी दिली होती.
Ans: घराच्या विक्रीतून निर्माण झालेल्या वैरातून.
Ans: कोयत्याने वार करून मंगेश यांना गंभीर जखमी करण्यात आले.
Ans: कुणाल उर्फ गोलू कांबळे (४५), गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला.






