Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील 105 ग्रामपंचायतींची मुदत संपली; गावागावांत आखाडे रंगायला सुरुवात

प्रभागांची प्राथमिक रूपरेषा तयार करणे, हरकती-सूचना मागविणे, जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडून मंजुरी, तसेच अंतिम प्रभाग यादी प्रसिद्ध करणे असे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 01:23 PM
मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

Follow Us
Follow Us:

वैजापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या मुदती ११ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गावखेड्यांतील आखाडे रंगायला सुरूवात झाली आहे.

तालुक्यात एकूण १३५ ग्रामपंचायती असून, यापैकी तालुक्यातील तब्बल १०५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपला आहे. विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार, प्रभागांची प्राथमिक रूपरेषा तयार करणे, हरकती-सूचना मागविणे, जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडून मंजुरी, तसेच अंतिम प्रभाग यादी प्रसिद्ध करणे असे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा : सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

वैजापूर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींचा यात समावेश असल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या दृष्टीने विविध पक्ष, स्थानिक आघाड्या व इच्छुक उमेदवारांनी गावपातळीवर संपर्क मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी आरक्षण, प्रभाग रचना आणि उमेदवारी यावरून चर्चाना सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू

ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे बदलणाऱ्या ठरतात. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकापाठोपाठ झाल्याने नेतेमंडळींचा ‘थकवा’ जात नाही तोच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू झाल्याने नेत्यांसह गावपुढाऱ्यांना पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा ‘डोळा’

तालुक्यातील शिऊर, खंडाळा, लासूरगाव, महालगाव, पालखेड, लोणीसारख्या (खुर्द) मोठ्या ग्रामपंचायतींवर सर्वच राजकीय पक्षांचा ‘डोळा’ असणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काही राजकीय पक्षांना वातावरण अनुकूल होते तर काही पक्षांची पिछेहाट झाली. ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षांच्या बॅनरवर लढवली जात नसली तरी निवडणुकीत पॅनल राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन उतरतातच. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची खेचाखेची या निवडणुकीतही पाहावयास मिळणार आहे.

भरउन्हाळ्यात तापणार राजकारण

वैजापूरमधील १०५ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी, गटबाजी, पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत. आरक्षण आणि प्रभाग रचना यावरूनही स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या निवडणुका तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या ठरणार असून ग्रामपातळीवरील नेतृत्वात मोठे बदल दिसू शकतात.

हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा

Web Title: Term of 105 gram panchayats in vaijapur chhatrapati sambhajinagar has expired

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.