Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

राहुड येथे भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन संजय इंगळे बेपत्ता झाल्यानंतर तपासात खून झाल्याचे उघड झाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2026 | 08:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील राहुड येथे भावाच्या हातून भावाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वाटणाऱ्या वादातून मोठ्या भावानेच धाकट्या भावाचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे.

‘ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या…’, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडींवर मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

चेतन संजय इंगळे (वय ३५) हा तरुण अचानक बेपत्ता झाल्यानंतर गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. तो घरी परतला नाही, यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थ चिंतेत होते. दरम्यान, गावचे पोलिस पाटील विलास बनसोडे यांना चेतनच्या खुनाची माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने पिंपळगावराजा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत मुळीक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला.

तपासादरम्यान संशयाची सुई चेतनचा मोठा भाऊ रोशन संजय इंगळे (वय ३६) याच्याकडे वळली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. रोशनने त्याचा मित्र रवी देविदास राऊत (वय ३६, रा. खामगाव) याला सुपारी देऊन भावाचा खून केल्याचे उघड झाले. बुधवारी दुपारी राहुड येथील शेतात चेतनला गाठून त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या चेतनचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातच जाळून टाकला. इतकेच नव्हे तर मृतदेहाची राख गोळा करून जवळील नदीत विसर्जित केली, ज्यामुळे गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला गेला. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

या घटनेमागे प्रेमप्रकरण आणि मालमत्तेचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चेतनचे दुसऱ्या जातीतील महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. त्यासाठी तो आपल्या वाट्याची शेती विकण्याच्या तयारीत होता. मात्र, याला मोठा भाऊ रोशनचा तीव्र विरोध होता. या वादातूनच त्याने भावाचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी रवी राऊत याला ११ हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी रोशनला अटक केल्यानंतर दुसरा आरोपी रवी राऊत हा खामगाव शहरात लपून बसल्याची माहिती मिळाली. शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्यालाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पिंपळगावराजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नातेसंबंधातील तणाव आणि लोभामुळे घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title: Washim news brothers thorn removed from minor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.