Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘1 सप्टेंबरलाच 4 लैंगिक अत्याचाराच्या घटना,’ कोलकाता प्रकरणानंतर ममता सरकार पुन्हा अडचणीत

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. डॉक्टर अत्याचाप प्रकरणाचा तपास सुरू असतानाच राज्यात लैंगिक छळाची आणखी चार प्रकरणे समोर आली आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 01, 2024 | 05:40 PM
‘1 सप्टेंबरलाच 4 लैंगिक अत्याचाराच्या घटना,' कोलकाता प्रकरणानंतर ममता सरकार पुन्हा अडचणीत

‘1 सप्टेंबरलाच 4 लैंगिक अत्याचाराच्या घटना,' कोलकाता प्रकरणानंतर ममता सरकार पुन्हा अडचणीत

Follow Us
Close
Follow Us:

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात अजूनही संतापाची लाट पाहायला मिळत आहे. कोलकाता प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू असतानाच राज्यात लैंगिक छळाची आणखी चार प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी (३१ ऑगस्ट २०२४) घडलेल्या या घटनांनंतर भाजपने पुन्हा एकदा टीएमसी सरकारवर निशाणा साधला आहे.

ही चार प्रकरणे उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी पुन्हा निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र, या सर्व प्रकरणात कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जाणून घेऊया कुठे, काय झाले आणि ममता बॅनर्जी पुन्हा प्रश्नांनी घेरल्या आहेत.

बीरभूम : येथील लांबाबाजार आरोग्य केंद्रात एका नर्सचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नादिया : नादियाच्या कृष्णगंजच्या भजनघाटमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेचे म्हणणे आहे की, जेव्हा ती सामान घेऊन घरी परतत होती तेव्हा शेजाऱ्याने तिला बागेत ओढले, तिच्यावर अत्याचार केला आणि धमकावले.

मध्यमग्राम: मध्यग्राममध्ये टीएमसी पंचायत सदस्यावर दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. लोक गोंधळ घालत आहेत.

हावडा सदर : हावडा सदर रुग्णालयाच्या सीटी स्कॅनर रूममध्ये शनिवारी रात्री एका मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे.

त्याचवेळी एकाच दिवसात आलेल्या या चार प्रकरणांबाबत भाजपही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी रविवारी (1 सप्टेंबर 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अमित मालवीय यांनी X वर लिहिले, “पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर 2024 चा पहिला दिवस लैंगिक छळाच्या चार प्रकरणांनी सुरू झाला.” या चार घटनांचा तपशीलवार उल्लेख करून त्यांनी टीएमसी सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

अमित मालवीय यांनी पुढे लिहिले, “ममता बॅनर्जींचे आभार, पश्चिम बंगाल हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य आहे. त्यांनी कठोर नियम लागू करण्यासाठी आणि बलात्कार आणि POCSO प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्यासाठी काहीही केले नाही. मुख्यमंत्री म्हणून ते आपत्तीजनक असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळानंतर राज्यातील उत्तर 24 परगणामध्ये तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील बीरभूम रुग्णालयातही एका परिचारिकेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकाता घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला घेरले असताना या दोन्ही घटना समोर आल्या आहेत. ममता बॅनर्जी 3 सप्टेंबर रोजी राज्य विधानसभेत फाशीची शिक्षा देणारे बलात्कार विरोधी विधेयक मांडण्याच्या तयारीत आहेत.

तृणमूल नेत्याच्या वक्तव्यावर संताप

उत्तर 24 परगणा येथील एका घटनेत, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाविरोधात लोकांच्या जमावाने मध्यमग्राममध्ये आरोपी आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुकानाची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने पीडित कुटुंबाला हे प्रकरण सोडवण्यास सांगितले तेव्हा लोक संतप्त झाले. लोकांचा रोष पाहता आरएएफ तैनात करण्यात आले आहे.

Web Title: West bengal rocked by 4 assault cases in a day including 2 in hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • BJP
  • Kolkata
  • RG Kar Medical College

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.